नामपूर : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्राथमिक शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक कारणांमुळे शिक्षकांच्या बदल्या राज्यभर गाजतात. बदल्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेक जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक क्लुप्त्या लढवून खोटी माहिती सादर करून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसतात.
अशी भामटेगिरी करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध ग्रामविकास विभाग ॲक्शन मोडवर आले असून, बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्याने ठगगिरी करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. या शासन निर्णयाचे प्राथमिक शिक्षक, शिक्षणप्रेमी, पालक आदींनी स्वागत केले आहे. (Nashik Teachers will be suspended they give false information for transfer)
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने मंगळवारी (ता. १८) नुकतेच सुधारीत बदली धोरण जाहीर केले असून, त्यात खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे. २०१८ पासून मानवी हस्तक्षेपाविना संगणकाद्वारे पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होत असल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
परंतु, गेल्या काही वर्षात बदली टाळण्यासाठी शिक्षकांबद्दल तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. अशा शिक्षकांची बदलीच्या संबंधित संवर्गाच्या कागदपत्रांची तत्काळ पडताळणी करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात यावा.
अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरुन बदली करुन घेतलेली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करुन शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित करावी, असे आदेशात नमूद आहे.
सुधारीत बदली धोरण निश्चित
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडचणी विचारात घेऊन शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर बदली धोरणातील त्रुटींबाबत प्राथमिक शिक्षक संघासह अन्य शिक्षक संघटनांकडून सूचना/निवदने शासनास प्राप्त झाली आहेत. तसेच, शासन निर्णयातील काही तरतुदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. (latest marathi news)
धोरणात सुधारणा विचाराधीन
उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला.
सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने बदली धोरणात अनेक महत्वपूर्ण बदल केले असून, त्याबाबतचा अध्यादेश राज्यशासनाचे उपसचिव पंडीत जाधव यांनी नुकताच निर्गमित केला आहे.
बदलीसाठी सवलत असणारे शिक्षक
*पक्षाघाताने आजारी शिक्षक
*दिव्यांग शिक्षक, मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक
*ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत
*हृदय शस्त्रक्रिया झालेले
* एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले/मुत्रपिंड रोपण केलेले/डायलीसीसग्रस्त
*यकृत प्रत्यारोपण झालेले
* कर्करोगाने ग्रस्त
* मेंदुचा आजार झालेले
* माजी सैनिक, आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/विधवा
* विधवा शिक्षिका, कुमारिका शिक्षिका
* परित्यक्ता/घटस्फोटीत महिला
* वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले
*स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा/मुलगी/नातू/नात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.