Nashik News : राज्यातील २२ ठिकाणी आज पारा चाळीशीच्या पुढे पोचलेला असताना नाशिकच्या कमाल तापमानात गेल्या दोन दिवसांमध्ये काहीशी घसरण झाली आहे. गुरुवारी (ता. ११) कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. (nashik temperature falls from 40 to 38 degrees celsius news)
शुक्रवारी (ता. १२) एक अंश सेल्सिअसने घसरण होत ३९.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शनिवारी (ता. १३) कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सिअस राहिले.
हवामान विभागातर्फे आणखी चार दिवस जिल्ह्यात उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज यापूर्वी वर्तवला आहे. आज उन्हाच्या झळांनी घशाची कोरड वाढली होती. सकाळी साडेनऊनंतर उन्हाची तीव्रता वाढीस लागली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सायंकाळनंतर वाहणाऱ्या वाऱ्याने काहीसा दिलासा दिला. मात्र उकाड्याच्या त्रासातून वाचण्यासाठी दिवसभर पंखे घसरत होते. कुलर, वातानुकूलित यंत्रे सुरु ठेवावी लागली आहेत. सामान्य माणूस, कष्टकरी घामांच्या धारांनी न्हाऊन निघाले आहेत.
राज्यात आज सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोलामध्ये झाली. त्याखालोखाल जळगावमध्ये ४५, परक्षणीमध्ये ४४.७, अमरावतीमध्ये ४४.६, मालेगावमध्ये ४३.८, सोलापूरमध्ये ४३.३, नांदेडमध्ये ४३.२, बीडमध्ये ४३, यवतमाळमध्ये ४३, धाराशीवमध्ये ४१.८, नगरमध्ये ४१.४ अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.