Hanuman Jayanti 2024 : श्रीराम भक्त हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यासाठी सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे. शहरातील हनुमान मंदिरांना हनुमान जन्मोत्सवानिमित्त रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच महाआरती, हनुमान चालिसा, हनुमान बीजमंत्र पठण, महाप्रसाद वाटपाचे नियोजन केले आहे. (nashik Temples are illuminated with decoration on occasion of Hanuman jayanti )
अंजनेरी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र अंजनेरी येथे मंगळवारी (ता.२३) हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजन केले असून उत्सवात दोन लाख श्रीरामभक्त श्री हनुमान चालिसा पठण करणार आहेत. या वेळी विश्वविक्रमी महाआरती होणार आहे. अंजनेरी येथे ध्वजारोहण, पहाटे पाचपासून साधू-महंतांच्या हस्ते महायज्ञ, सकाळी पावणेदहाला भाविकांच्या उपस्थितीत महाआरती, हनुमान बीजमंत्र पठण, साधू-महंतांना भगवे वस्त्रदान, भक्तांसाठी महाप्रसाद होणार आहे. (latest marathi news)
पंचमुखी हनुमान मंदिर
श्री पंचमुखी हनुमान मंदिरात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे पाचला अभिषेक पूजन, सकाळी सव्वा सहाला हनुमान जन्मोत्सव, महाआरती होणार आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अखंड हनुमान चालिसा पठण तसेच सकाळी नऊला पूजन व हवन होईल. दुपारी २ वाजता भजन, पाठ तर सांयकाळी सातला पुष्पांजली ग्रुपतर्फे संगीतमय सुंदरकांड पाठ करण्यात येणार आहे. दरम्यान भाविकांना दिवसभर लाडू प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
दक्षिण मुखी सोन्या मारुती
सराफ बाजारातील नवसाला पाहणारा श्री दक्षिण मुखी सोन्या मारुती मंदिरात मंगळवारी (ता २१) सकाळी सहा वाजता जन्म सोहळा होणार आहे. हनुमान जन्म झाल्यानंतर सकाळी व सायंकाळी आरती होणार आहे. यानंतर सर्व भक्तांना २५१ किलो लाडूचा प्रसाद व पंजिरी वाटणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.