Goda Ghat  esakal
नाशिक

Nashik Goda Ghat : गोदाघाटासह सर्व मंदिरांमध्ये उसळतेय गर्दी; वीकेंडचे औचित्य साधत पर्यटक भाविकांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Goda Ghat : वीकेंडचे औचित्य साधत शनिवार (ता. ८)पासून पर्यटक भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे गोदाघाटावरील पार्किंगसह सर्वच मंदिरांत गर्दी वाढली आहे. सकाळच्या सुमारास गोदाघाटावर वाहने उभी करायलाही जागा नसते, एवढ्या मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. प्रभू श्रीरामाच्या वनवासातील मोठा काळ पंचवटी परिसरात व्यतीत झाला आहे. (temples including Goda Ghat is crowded with tourists devotees celebrating weekend )

ज्याकुटीत श्रीराम, लक्ष्मण व सीतेचे वास्तव्य होते त्याचठिकाणी श्री काळाराम मंदिराची उभारणी करण्यात आली. याशिवाय देशातील नंदी नसलेले एकमेव शिवालय अशी श्री कपालेश्‍वर मंदिराची ख्याती आहे. वनवासकाळात श्रीराम ज्या ठिकाणी वास्तव्यास होते ती सीतागुंफाही याच भागात असून, निसर्गरम्य तपोवनही याच परिसरात असल्याने पर्यटक भाविकांची बारमाही वर्दळ असते.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्री त्र्यंबकेश्‍वराची मोहिनीही भाविकांवर मोठी आहे. सणवार, सार्वजनिक सुट्यांच्या काळात तर गर्दीत मोठी वाढ होते. गर्दीमुळे येथील मंदिरांसह व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आले आहे. वादात अडकलेल्या मेकॅनिकल गेटच्या कामामुळे गांधी तलाव कोरडाठाक पडला आहे, तरीही गोदा महाआरतीमुळे सायंकाळी रामतीर्थावर मोठी गर्दी उसळते. त्यामुळे येथील छोटे-मोठे व्यवसाय तेजीत आहेत. (latest marathi news)

वाहने जास्त, वसुली कमी

गोदाघाटावरील म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, जुना भाजीबाजार याठिकाणी पर्यटकांची वाहने पार्क केली जातात. मात्र, केवळ म्हसोबा पटांगणावरच मनपाची शुल्क वसुली होते. याठिकाणी मोठ्या वाहनांसाठी शंभर रुपये, तर लहान वाहनांसाठी चाळीस रुपये शुल्क वसूल केले जाते. या वसुलीसाठी केवळ एकाच व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याने संपूर्ण वसुली होत नसल्याने महापालिका महसूलही मोठ्या प्रमाणात बुडतो; परंतु याकडे संबंधित यंत्रणेचीही लक्ष नसल्याने ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’, अशी स्थिती आहे.

पुलावरील पार्किंगकडे दुर्लक्ष

अनेक वाहनधारक गाडगे महाराज पुलावर वाहने उभी करतात. पूर्वी ही संख्या मोजकी होती; परंतु आता पूर्ण पूलच व्यापून गेला आहे. पार्किंगमुळे पुलाचा अर्धा भाग व्यापला जात असल्याने वाहतुकीसाठी अर्धाच भाग शिल्लक राहतो. या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केल्यास व ती गोदाघाटावर पार्क केल्यास महापालिकेच्या महसुलातही मोठी वाढ होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT