Nashik News : अक्षयतृतीया म्हणजे घरोघरी पुरणपोळी अन् आंब्याचा रस ठरलेला. त्यासाठी लगबगीने तयारीदेखील केली जाते. परंतु या धावपळीच्या युगात घरी आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा बेत करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे बाजारातून तयार आंब्याचा रस व पुरणपोळ्या बनवून घेतल्या जात आहेत. (Tendency of citizens to consume ready made mango juice and puranpoli)
रेडिमेड आंब्याचा रस आणि पुरणपोळी खाण्याकडे नागरिकांचा कल असून मोठ्या प्रमाणावर अक्षयतृतीयानिमित्त मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. फळांचा राजा आंबा अक्षयतृतीयेपासून नागरिक खाण्यास सुरवात करतात अशी परंपरा मानली जाते. त्यामुळे अक्षयतृतीयेला आंब्याचा रस यासह पुरणपोळीचा बेत घरोघरी आखला जातो.
प्रामुख्याने याचा देवासमोर नैवेद्यही दाखविला जातो. शहरात मात्र घरातील प्रत्येक व्यक्ती धावपळीच्या काळात आपल्या कामात व्यस्त असल्याने आंबे आणून त्याचा रस तयार करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे बाजारात ज्यूस विक्रेत्यांनी आंब्याचा रस तयार करून विकण्यास सुरवात केली आहे.
आपली आवड व बजेटनुसार हापूस, केशर, बदाम यासारख्या आंब्याचा रस विक्रेत्यांकडून तयार करून दिला जातो. प्रतिलिटर याप्रमाणे रसाची विक्री केली जाते. सध्या ८० ते ३०० रुपये लिटरपर्यंत आंब्याच्या प्रकारानुसार रसाचे दर आकारले जात आहेत. नागरिकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत असून अक्षयतृतीया दिवशी किमान ५०० ते ७०० लिटर आंब्याचा रस विक्री होईल, अशी खात्री विक्रेते गुड्डू सोनकर यांनी व्यक्त केली आहे. (latest marathi news)
मांड्यांना मोठी मागणी
अक्षयतृतीयेला आंब्याच्या रसासह खवय्ये पुरणपोळी वर ताव ताव मारतात. सध्या बाजारात पुरणपोळीदेखील तयार करून मिळते. यात विशेषतः खानदेश परिसरातील प्रसिद्ध असे खापरावरील मांडे खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत. अक्षयतृतीयानिमित्त पुरणपोळी मांड्यांना देखील मोठी मागणी आहे.
५० ते ९० रुपये प्रतिमांडा याप्रमाणे विक्री होत आहे. तर ग्राहकांनी डाळ, गूळ, तूप आणि कणीक हे साहित्य दिल्यास बनविण्याची मजुरी ३०० ते ४५० रुपये प्रतिकिलो या दराने बनवून दिले जाते अशी माहिती रामकृष्ण जगताप यांनी दिली.
असे आहेत तयार रसाचे दर
हापूस आंबा रस - १५० ते ३५० रुपये लिटर
केशर आंबा रस - १०० ते २०० रुपये लिटर
बदाम आंबा रस - ८० ते १५० रुपये लिटर
"आम्ही अनेक वर्षापासून आंब्याचा रस विक्री करत असून ग्राहकांनादेखील गोड चवीचा रस खायला मिळत असल्याने अक्षयतृतीयेला तयार आंब्याच्या रसाला मोठी मागणी असते. ५०० ते ७०० लिटर आंब्याचा रस विक्री होईल अशी खात्री आहे." - गुड्डू सोनकर, आंबा रस विक्रेता.
"खानदेशी खापरावरील पुरणाचे मांडे नाशिककर मोठ्या चवीने खातात. अक्षयतृतीयानिमित्त पाचशे खापरावरील मांड्यांची ऑर्डर आमच्याकडे आहे." - रामकृष्ण जगताप, शिवनेरी केटरिंग सर्विस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.