Nashik News : गेल्या ४५ वर्षांपासून शासनस्तरावर कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रलंबित पडलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती कामासाठी महायुती सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये ६५ कोटी ३३ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली होती. आता राज्यपालांच्या वतीने विशेष दुरुस्ती कामासाठी ४५ कोटी १७ लाख रुपयांची निविदा जलसंपदा विभागाच्या नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाने मंगळवारी (ता. ३०) काढल्यामुळे ओतूर परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ( Tender of 45 crore for repair of Other Minor Irrigation Project)
गेल्या ४५ वर्षांपासून ओतूर प्रकल्प असून नसल्यासारखा आहे. प्रत्येक निवडणुकीत या प्रकल्पाचा विषय चर्चेत येतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार नितीन पवार यांनी दिवंगत ए. टी. पवार यांनी ओतूर प्रकल्पाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. त्यासाठी त्यांचा मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरु होता. साडेचार वर्षात मंत्रालयस्तरावर यासंदर्भात ३ ते ४ बैठका झाल्या.
गेल्या १६ जानेवारी रोजी ओतूर परिसरातील शिष्टमंडळाने आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट ओतूर परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी या प्रकल्पाच्या कामाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. ओतूर प्रकल्पाच्या दुरुस्तीला मी निधी देणार अन् तुमचा प्रश्न मार्गी लावणार, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत दिला होता. (latest marathi news)
तो शब्द ६ फेब्रुवारी २०२४ रोजी खरा करुन दाखवत या प्रकल्पाच्या कामासाठी ६५ कोटी ३३ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली होती. गेल्या ४५ वर्षांपासून प्रलंबित ओतूर प्रकल्पाच्या कामाची जलसंपदा विभागाने निविदा काढल्यामुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार असल्यामुळे या परिसरातील व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
''ओतूर प्रकल्पाचे दिवंगत ए. टी. पवारांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असल्यामुळे याप्रश्नी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरु होता. यासंदर्भात मंत्री महोदय, अधिकारी व शेतकरी बांधवांसमवेत ३ ते ४ बैठका झाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी दिलेला शब्द पूर्ण केला. ६ फेब्रुवारी रोजी ६५ कोटी ३३ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. आज या कामासंदर्भात ४५ कोटी रुपयांची निविदा निघाल्यामुळे मनस्वी आनंद आहे.''- नितीन पवार, आमदार, कळवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.