Municipal Theater esakal
नाशिक

Nashik News : कोट्यवधी खर्चून उभारलेले नाट्यगृह बंदच! वस्तू वापराअभावी खराब होण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंचवटीतील हिरावाडी परिसरातील महापालिकेच्या सहा एकरच्या जागेत सुमारे २५ कोटी रुपये खर्च उभारलेले नाट्यगृह अद्यापही बंदच आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभी केलेली ही वास्तू अधिक काळ बंद राहिल्यास त्या वस्तू वापराअभावी खराब होण्याची भीती निर्माण झालेली आहे. (theatre built at cost of around Rs 25 crore is still closed)

कार्यक्रमासाठी नाट्यगृहाची मागणी केली असता अजून त्याबाबत काही निर्णय झालेला नाही, असे उत्तर मनपा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. आधी उद्‌घाटनाची प्रतीक्षा होती आता उद्‌घाटन झाले पण नाट्यगृह कार्यक्रमासाठी तत्काळ खुले करावे, याकडे लक्ष वेधले आहे. या कामाच्या शुभारंभाला पाच वर्ष पूर्ण झाली, तरी त्याआधी मनपा प्रशासनाने उपाययोजना करून नाट्यगृह नाशिककरांसाठी व पंचवटीकरांसाठी खुले करावे.

याशिवाय परिसरातील दुसऱ्या सभागृहाचे नूतनीकरणाचे काम स्मार्टसिटी अंतर्गत सुरु करण्यात आलेले आहे, तेदेखील अजून सुरु झालेले नाही. त्यामुळे परिसरातील दोन भव्य वास्तू बंद पडलेल्या स्थितीत आहे. याबाबत अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष विजय राऊत यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.

असे आहे नाट्यगृह -

हिरावाडी परिसरातील महापालिकेच्या सहा एकरच्या जागेत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या नाट्यगृहाचे उद्‌घाटन १० फेब्रुवारीला झाले. चार वर्षांच्या कालावधीत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सहा एकरच्या जागेत २९०० चौरस मीटरचे बांधकाम झाले असून, आवारात बांधकामाच्या पश्चिमेला वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था आहे. (latest marathi news)

नाट्यगृहात आवश्यक त्या सर्वच प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असून, दोन्ही बाजूला प्रसाधनागृहांची व्यवस्था आहे. प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था, स्वयंचलित सरकते पडदे, बाल्कनीत १५० आणि खाली ५०० अशा ६५० आरामदायी खुर्च्यांची आसनव्यवस्था आहे.

"पंचवटी परिसरात २५ कोटी रुपये खर्च करून उभारलेली वास्तू बंद पडली आहे. एवढी प्रशस्त आणि भव्य वास्तू बंद ठेवल्यामुळे महानगरपालिकेचे नुकसान होत आहे शिवाय जास्त दिवस बंद राहिल्यास येथील वस्तू खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर मनपा आयुक्तांनी लक्ष देऊन तत्काळ मार्ग काढावा." - विजय राऊत, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT