The pipe connected to the water supply well here is replaced with a valve for theft esakal
नाशिक

Nashik News : जलवाहिनी फोडून पिण्याच्या पाण्याची चोरी; चंदनपुरी येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जातेगाव गृप ग्रामपालिकेंतर्गत असलेल्या चंदनपुरी येथील पाणीपुरवठा योजनेच्या एअरव्हॉल्वचे नट खोलून पाणीचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सटवाई तलावाच्या बाजूला असलेले शेतकरी सुरेश शंकर चव्हाण यांनी त्यांच्या शेतातून गेलेल्या मुख्य जलवाहिनीमधून पाणी चोरत तेथे १४ पाइप जोडून स्वतः मालकीच्या विहिरीत टाकले आहे अशी तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. (Theft of drinking water by breaking water pipes in Chandrapur )

कायदेशीर कारवाई अन गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. माजी सरपंच संतोष डांगे, मधुकर निंबारे, अंकुश चव्हाण, साईनाथ चव्हाण, रावसाहेब जाधव, सुरेश जाधव, संजय चव्हाण यांच्या समक्ष प्रत्यक्ष पाहाणी करून शुक्रवारी (ता.२४) सकाळी आठला पंचनामा केला व अनधिकृतपणे ग्रामपालिकेच्या मुख्य जलवाहिनीस जोडण्यात आलेले १४ पाइप जप्त करून ग्रामपालिका कार्यालयात आणले.

येथील जुन्या आणि नविन जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. चंदनपुरी येथून गावासाठी येथील सटवाई तलावात खोदलेल्या विहिरीत साधारण एक महिन्यापासून दररोज दोन टॅंकर पाणी टाकून तेथून तीन किलोमीटर चंदनपुरी गावातील पिण्याच्या टाकीत टाकून नळपाणी पुरवठा योजनेद्वारे वितरण करण्यात येत होते.

पाणीपुरवठा सुरळीत सुरू असतानाच दोन- तीन दिवसांपासून अचानक टाकीत पाणी का येत नाही म्हणून येथील पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता वरील प्रकार उघडकीस आला. दुसऱ्या एका घटनेत जातेगाव येथे देखील पाणीटंचाई असून जलजीवन मिशन आणि इतर वेगवेगळ्या योजनेंतर्गत खोदलेल्या सर्व विहिरी कोरड्या पडल्यामुळे गावचा पाणीपुरवठा योजना सुरळीत राहावा यासाठी परिसरातील काही विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या.

अधिग्रहीत केलेल्या एका विहिरीचे पाणी येथील भारत निर्माण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विहिरीपासूनच्या मुख्य जलवाहिनीला जोडून गावातील पाण्याच्या टाकीत काही दिवसांपूर्वी आणले होते. त्या मुख्य जलवाहिनीतून देखील एकाने विनापरवाना पाणी घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

ग्रामविकास अधिकारींचे दुर्लक्ष

या दोन्ही पाणी चोरी प्रकरणात सायंकाळी उशिरापर्यंत काहीही कारवाई झालेली नव्हती. ग्रामविकास अधिकारी गोपाल चौधरी यांच्या दिरंगाईमुळे कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आली नसून, पाणी चोरी प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्यात न आल्यास लोकशाही मार्गाने पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे चंदनपुरी येथील नागरिकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT