Dindori Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : जळगावकरांच्या हाती दिंडोरीचे स्टिअरिंग; संकटमोचक गिरीश महाजनांचा मतदारसंघात तळ

Lok Sabha Election : कांदा प्रश्नामुळे हा मतदारसंघ ‘डेंजर झोन’मध्ये सापडल्याने भाजपने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला... मात्र, कांदा प्रश्नामुळे हा मतदारसंघ ‘डेंजर झोन’मध्ये सापडल्याने भाजपने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला. मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभा घ्यावी लागली, तर संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांना मतदारसंघात उडी घेत तळ ठोकावा लागला. त्यासाठी जळगावमधून मोठी फौजदेखील मदतीसाठी दाखल होती. ( There was picture in constitution that only Jalgaonkar had taken up voting for Dindori)

या जळगावकरांनीच दिंडोरीचे मतदान हाती घेतल्याचे चित्र मतदारसंघात होते. सलग चार लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपने काबीज केला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपचे फारसे संघटन नाही. मात्र, या परिस्थितीत निवडणुकीत नियोजनबद्ध काम करत भाजपने बाजी मारली आहे. यंदा या मतदारसंघातून भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवत त्यांना रिंगणात उतरविले. (latest marathi news)

मात्र, कांदा प्रश्नावरून प्रचारापासून भाजपची मतदारांसह स्वपक्षातील नेत्यांनी कोंडी केली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेऊन संघटनेला ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कांदा आम्हाला रडवत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे हा मतदारसंघ काहीसा अडचणीत सापडत असल्याचे दिसू लागले. त्यामुळे भाजपने मतदारसंघासाठी सारी शक्ती पणाला लावण्यास सुरवात केली. यासाठी संकटमोचक महाजन थेट दिंडोरीच्या रिंगणात उतरले.

त्यासाठी मंत्री महाजन यांनी थेट जळगावमधील विश्वासूंची फौज बोलावून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे प्रचारसभा घेतली. सभा घेतल्यानंतर मंत्री महाजन यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या आमदारांनी अॅक्टिव्ह केले. केवळ अॅक्टिव्हच केले नाही, तर त्यांना मैदानात उतरण्यास भाग पाडले. जळगावमधून आलेल्या प्रत्येकांवर विधानसभानिहाय जबाबदारी सोपविली. या नेत्यांनी मतदारसंघात ठाण मांडून पक्षाची यंत्रणा कार्यान्वित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT