crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास; शहरात चोरट्यांचा धुडगूस

Nashik Crime : शहरात एकीकडे गुन्हेगारांनी डोके वर काढले असून, सर्रासपणे रात्रीवेळी हाणामारीच्या घटना घडत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरात एकीकडे गुन्हेगारांनी डोके वर काढले असून, सर्रासपणे रात्रीवेळी हाणामारीच्या घटना घडत आहेत. तर दुसरीकडे चोरट्यांचेही प्रताप वाढीस लागले आहेत. भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड लंपास केली आहे. तर, बसस्थानकात महिलेच्या बॅगेतील दागिने, अन्य घटनांमध्ये मोबाईल, लॅपटॉप, वाहनाच्या बॅटर्या चोरट्यांनी चोरून नेला आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यात मात्र शहर पोलिसांना अपयश आले असून पोलिसांवर चौहुबाजूने टीकेची झोड उठली आहे. (Thieves looted 50 thousand cash from trunk of two wheeler )

हिरानंद नरहरी धीवर (रा. समर्थनगर, जत्रा हॉटेलजवळ, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. २७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते सिन्नर फाटा येथील निसर्ग लॉन्स येथे आले असता, त्यांची दुचाकी पार्क केली. दुचाकीच्या डिक्कीत त्यांनी ५० हजारांची रोकड ठेवलेली होती. अवघ्या दहा मिनिटांनी ते परत आले असता, त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडी होती.

ती पाहून त्यांनी डिक्कीतील रोकड तपासली असता, रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केलेली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जुने सिबीएस येथे आलेल्या महिलेच्या बॅगेतील ७४ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरून नेले.

स्वाती देशमुख (रा. दुसरबीड, ता. सिंदखेडाराजा, जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. २७) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास त्या जुने सिबीएस येथे आल्या असता, बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील रिंगा, रोकड असा ७४ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोडवरील सौभाग्य नगर येथे फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरट्यांनी लॅपटॉप व साहित्य चोरून नेले. मानस सुधीर येवले (रा. शिवस्मृती अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) या युवकाच्या फिर्यादीनुसार, २२ तारखेला सकाळी १० ते दुपारी साडेतीन यादरम्यान अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा दरवाजा उघडून लॅपटॉप, चार्जर, इअरफोन, बर्डस-२ असा ४२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, सिडकोतील अश्विननगरमध्ये संशयिताने लॅपटॉप चोरून नेला आहे. संदीप निदनाई (रा. गणेश चौक, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. शुभांगी कैलास कंकाळ (रा. गौरंग बंगला, अश्विननगर, सिडको) या युवतीच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. २८) सकाळी ९ वाजता संशयिताने गौरंग बंगल्यातून १५ हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. सदरचा लॅपटॉप शुभांगी यांना कंपनीने दिलेला होता. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवाहू वाहनाची बॅटरी चोरीस

नाशिकरोड परिसरातील आनंदनगरमध्ये बंगल्याजवळ पार्क केलेल्या मालवाहू छोटा हत्ती वाहनाची ६ हजारांची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. निलेश संतोष जाजू (रा. गिता दर्शन सोसायटी गायके कॉलनी, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ८ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सदरची चोरी केली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचरच्या दुकानातून मोबाईल चोरीला

शिंदे गाव येथे असलेल्या कोहिनूर टायर पंचर दुकानातून चार हजारांचा मोबाईल अज्ञात संशयिताने चोरून नेला. मोहम्मद आसिक मन्सुरी (रा. शिंदेगाव) याच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. २७) पहाटे दोनच्या सुमारास संशयिताने मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stampede at Bandra Terminus station: वांद्रे टर्मिनलवर मोठा गोंधळ! चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी; व्हिडिओ व्हायरल

Nithin Kamath: ‘माझा स्वतःचा फोन सतत सायलेंट असतो...’; Zerodha चे संस्थापक नितीन कामथ यांनी सांगितलं यशामागील तत्वज्ञान

Maharashtra Election: राज्य व केंद्राच्या यंत्रणांकडून कारवाई; गेल्या २४ तासांत ५२ कोटी जप्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का! निवडणूक जिंकली तरी होणार नाहीत मुख्यमंत्री; भाजपने दिला नवा फॉर्म्युला

Dhananjay Munde: लोकसभेतील राड्याचा विधानसभेवर परिणाम! निवडणूक आयोगाने धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाची हायकोर्टाला दिली 'गॅरंटी'

SCROLL FOR NEXT