Hoardings (file photo) esakal
नाशिक

Nashik News : अवघ्या 3 तासात तेराशे होर्डिंग्ज हटविले

Nashik : लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेची घोषणा होताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने राजकीय पक्षांचे होर्डिंग, बॅनर झेंडे उतरण्याचे काम हाती घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेची घोषणा होताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने राजकीय पक्षांचे होर्डिंग, बॅनर झेंडे उतरण्याचे काम हाती घेतले. अवघ्या तीन तासांमध्ये एकूण १३७३ बॅनर, होर्डिंग हटविण्यात आल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात जानेवारीपासून वातावरण तापले आहे. जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पार पडला. (Nashik Thirteen hundred hoardings were removed in just 3 hours due to code of conduct)

त्यानंतर पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये दोन दौरे केले. फेब्रुवारीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध कामांचा शुभारंभ केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षाचे विविध कार्यक्रम पार पडले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा नुकताच पार पडला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा भारत जोडो न्याय यात्रादेखील नाशिकमधून गेली. (latest marathi news)

आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजकीय मेळावे पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक व ग्रामीण भागात विविध कार्यक्रम झाले. मेळाव्याच्या निमित्ताने संपूर्ण शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले.

शहरातील एकही कोपरा राजकीय बॅनरशिवाय राहिलेला नाही. संपूर्ण शहरात कुठे झेंडे, तर बॅनरबाजी झाल्याने शहराला विद्रूपीकरणदेखील आले. राजकीय दबावामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेदेखील कारवाई केली नाही. मात्र, आता आचारसंहिता लागू होताच अतिक्रमण विभागाने सहा विभागातील होर्डिंग, बॅनर, झेंडे उतरविण्याची मोहीम हाती घेतली. संपूर्ण शहरात १३७३ बॅनर होर्डिंग्ज हटविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : मराठी माणसांचे दोन पक्ष तोडण्याचे काम भाजपाने केले - जयंत पाटील

SCROLL FOR NEXT