Crop Insurance  esakal
नाशिक

Crop Insurance : पीकविम्याच्या मार्गात निकषांचे धोंडे! पैसे मिळणार तरी कधी? स्थानिक कृषि अधिकारीही गप्पच

अंबादास देवरे

सटाणा : प्रधानमंत्री पीक विमा योजना बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरते की काय अशी स्थिती आहे. गेल्या खरीप हंगामात घेतलेल्या पिक विमा योजनेपासून हजारो शेतकरी वंचित असल्याने केंद्राच्या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खरिप पिकास विम्याचे कवच अल्पदरात देण्याची शासनाने हमी दिली. (thousands of farmers are deprived of crop insurance scheme taken during Kharif season)

मात्र तांत्रिक मुद्द्यांच्या व निकषाच्या नावाने पीक विमा कंपन्यांनी टाळाटाळ सुरू केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळवून देण्याबाबतत बागलाण तालुका कृषी अधिकारी ॲक्शन मोडवर नसल्याने पिक विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता धूसर होत चालल्याचे चित्र आहे. केंद्राने केवळ एक रूपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली.

तालुका कृषी विभागाच्या प्रचार आणि प्रसारामुळे बागलाण तालुक्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला रेफरन्स देऊन योजनेत भाग घेतला. खरिप पीक कापणी प्रयोग करताना (पीक आणेवारी) त्याचे वेळापत्रक कृषी विभागाने विमा कंपनीला दिले नसल्याचे कारण देत इन्शुरन्स कंपनीने विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली.

कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी कंपनीचा हा आक्षेप सबळ पुरावा देत फेटाळून लावला. नैसर्गिक संकटांमुळे वाया गेलेले पीक प्रस्ताव कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीस स्वीकारण्यास भाग पाडले. पिक विमा रक्कम मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या खऱ्या, मात्र त्याला अजूनही मुहूर्त मिळत नाही.

बारा महसूल मंडळांचा समावेश

बागलाण तालुक्यातील १२ महसूल मंडळाचा समावेश मदतीसाठी करण्यात आला. गेल्या खरीप हंगामातील पीक विमा रक्कमेची भरपाई कंपनीकडून येत्या खरीप हंगामापर्यंत ही त्या शेतकऱ्यांना मिळाली नाही. शासनाने देऊ केलेल्या या हक्काची पिकविमा रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. (latest marathi news)

गेल्या २०२४ या आर्थिक वर्षात शासनाकडून दिवाळीपूर्वी पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा होईल अशा घोषणाही झाल्या होत्या. मात्र बागलाण तालुक्यात ठरविक महसुल मंडळातील बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग झाली.

दोन मंडळाना लाभ, इतरांचे काय?

बागलाण तालुक्यात गेल्या खरीप हंगामातील सरासरीपेक्षा ५० ते ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आणि सर्वच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. गेल्या २०२३ मधील रब्बी हंगामात गारपिटीमुळे कांदा व इतर पिके वाया गेली होती. खते बी- बियाण्यांसह पेरणी, मशागतीचाही खर्च निघाला नाही.पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकेही वाया गेली. चारा आणि तीव्र पाणीटंचाईचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.

तालुक्यातील फक्त नामपूर व ब्राम्हणगाव मंडळातील काही शेतक-यांना पिक विमा रकमेचा लाभ मिळाला तर इतर मंडळातील शेतकरी आजही वंचित आहेत. शेजारील मालेगाव तालुक्यातील पालकमंत्री असल्याने सर्व दुष्काळी सवलतींचा लाभ मिळतो मग बागलाण तालुक्यावर अन्याय का? असा प्रश्नही तालुक्यात उपस्थित केला जात आहे.

तालुक्यातील एकूण शेतकरी - ८५०००

पीकविमा काढणारे शेतकरी- ५४०००

महसुल मंडळे - १२

अधिकारी नॉट रिचेबलच

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिकांसाठी, तयार पीक काढण्यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, सरासरी उत्पन्नावर आधारित घट झालेल्या विमाधारकांना विमा रक्कम मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. वंचित लाभार्थी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, तालुका कृषी अधिकारी मात्र नेहमीच नॉट रिचेबल असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चलबिचल निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT