Ongoing leakage of water tank in Yeola Bajirao Nagar. In the second photo, water is stored under the tank. esakal
नाशिक

Nashik News : पाइपच्या गळतीने टाकीतील रोज हजारो लिटर पाणी वाया! येवल्यात टंचाई असूनही गळतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष

Nashik News : येवला शहरातील बाजीरावनगर मधील पाण्याच्या टाकीच्या पाइपला लिकेज होऊन सलग १२ ते १५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : शहराला अगोदरच आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असून टंचाईचे सावट दूर झालेले नाही. अशात शहरातील बाजीरावनगर मधील पाण्याच्या टाकीच्या पाइपला लिकेज होऊन सलग १२ ते १५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तक्रारी करूनही या गळतीकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. (Thousands of liters of water in tank are wasted every day due to leaking pipes)

शहराच्या टप्पा क्रमांक दोनच्या पाणीपुरवठा योजनेतच्या साठवण तलावालगत जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. या ठिकाणाहून शुद्धीकरण झालेले पाणी शहरातील बाजीराव नगर, विंचूर रोड, गंगादरवाजा, जुने तहसील कार्यालय आदी ठिकाणी असलेल्या उंच टाक्यांमध्ये टाकून तेथून शहराच्या विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो.

बाजीराव नगर परिसर उंचावर असल्याने या ठिकाणी पाण्याच्या दोन टाक्या बांधलेल्या आहेत. येथून शहराचा हुडकोसह गंगादरवाजा, फत्तेबुरुज नाका परिसरापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. मात्र येथील टाकीच्या पाइपला गेल्या १२ ते १५ दिवसापासून मोठे लिकेज असून २४ तास टाकीच्या पाइपातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे.

एकीकडे धरणात तसेच साठवण तलावात अत्यल्प पाणीसाठा असल्याने शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिक मोठी काटकसर करून पाणी वापरत आहे. त्याचवेळी नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या टाकीवरून हजारो लिटर पाण्याचा रोज अपव्यय सुरू आहे. (latest marathi news)

तक्रारीकडे दुर्लक्ष

यासंदर्भात पालिकेच्या संबंधितांना अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे नागरिकांसह अनेकांनी तक्रारी केल्या. सोशलमीडियावर पाणी गळतीचे व्हिडिओ फिरले. मात्र आम्ही ठेकेदाराला काम दिले आहे, तो काम करणार आहे, आज काम होईल, उद्या काम होईल असे उत्तर पालिका प्रशासनाकडून मिळत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

पाण्याच्या नासाडीला कारणीभूत कोण?

दहा ते पंधरा दिवसात या टाकीतून लाखो लिटर पाणी वाया गेले असून या भागात साचलेल्या पाण्याने दलदल झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने नगरपालिकेने पाटबंधारे विभागाकडून विकत घेतलेल्या पाण्याच्या नासाडीला कारणीभूत कोण? असा सवाल करून वाया गेलेल्या पाण्याच्या बदल्यात पाणीपट्टीचा भुर्दंड नागरिकांवरच का? असा प्रश्न नागरिक करत आहेत.

"नगरपालिका नागरिकांकडून वर्षाची पाणीपट्टी वसूल करते. मात्र पाणी आठवड्यातून एकदाच किंवा क्वचित दोनदा पाणीपुरवठा होते. हा नागरिकांवर अन्याय असताना आता आमच्या भागात रोज हजारो लिटर पाणी वाया जात असून त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पाइपची त्वरित दुरुस्ती करून पाणी गळती थांबवावी अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढला जाईल." - आकाश नागरे, सामाजिक कार्यकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT