industrial sector esakal
नाशिक

Nashik News : नाशिक प्रादेशिक कार्यालयांतर्गत कार्यान्वित कंपन्यांमार्फत साडेतीन लाखांवर रोजगार

Nashik News : जगात सर्वांत वेगाने बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रात विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक हा देशातील इतर शहरांच्या तुलनेत आघाडीवर आहे.

सतीश निकुंभ

सातपूर : जगात सर्वांत वेगाने बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रात विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक हा देशातील इतर शहरांच्या तुलनेत आघाडीवर आहे. या विकासात औद्योगिक क्षेत्रात आपला टक्काही तेवढ्याच गतीने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत नाशिक जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नरडाणा. (Three and a half lakhs employment through companies operating under Nashik regional office)

नंदुरबार व जळगाव आदी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर नवीन औद्योगिक वसाहती निर्माण झाल्याने तसेच गुजरात लाइन कनेक्टिव्हिटीमुळे मोठ्या प्रमाणावर गुतंवणूक होताना दिसत आहे. ‘एमआयडीसी’चा १ ऑगस्टला वर्धापन दिन साजरा करताना ‘सकाळ’ने घेतलेला हा आढावा. नाशिक जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींत ५६५ उद्योगांनी एकूण पाच हजार ६९५.४५ कोटींची गुंतवणूक केली असून.

यातून २७ हजार ३९३ रोजगारनिर्मिती झाल्याची नोंद औद्योगिक विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार दिसून येते. महिंद्र व इतर मोठ्या उद्योगांच्या विस्तारीकरणाचा आकडा वेगळाच आहे. यात गेल्या काही वर्षांत गुंतवणुकीचा आकडा हा सर्वांत वेगाने वाढताना दिसत असून, ही नाशिक विभागाची आतापर्यंतची सर्वांत सकारात्मक वाटचाल असल्याचे ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी व धुळे.

नंदुरबार, जळगावचे प्रादेशिक अधिकारी नितीन पाटील तसेच अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यांत फार्मा, ऑटोमोबाईल, सिमेंट, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग, हॉटेल तसेच कृषी प्रक्रिया उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे त्या-त्या जिल्हा उद्योग केंद्राच्या आकडेवारीच्या माध्यमातून पुढे आले आहे.

नाशिक जिल्ह्यात सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, विंचूर, येवला, गोंदे, इगतपुरी, सायने या ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहेत. तर नव्याने अजंग-वडेल, आडवणे, मापारवाडी, जाबूंटके, राजूरबहुला, दिंडोरी, अक्राळे, मनमाड, पेठ यांचा समावेश होत आहे. नाशिक प्रादेशिक कार्यालयांतर्गत कार्यान्वित कंपन्यांमार्फत साडेतीन लाखांवर रोजगार उपलब्ध झाला आहे. (latest marathi news)

नाशिक विभागात सध्या कार्यान्वित ‘एमआयडीसी’ क्षेत्रासाठी ९२३९.३९ हेक्टर क्षेत्र ताब्यात आहे. नाशिक जिल्ह्यात मौजे जांबुटके (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथे ३१.५१ हेक्टर आर क्षेत्रात संपूर्ण औद्योगिक क्षेत्र हे ट्रायबल इंडस्ट्रिअल क्लस्टरसाठी राखीव ठेवले आहे. तसेच दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात १०० एकर क्षेत्रावर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रस्तावित आहे. तसेच नव्याने इंडियाबुल्सची सुमारे ५१४ हेक्टर जमीन परत मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

धुळे-नंदुरबारमध्ये गुंतवणूक

धुळे प्रादेशिक कार्यालयांतर्गत धुळे व जळगाव अशा दोन औद्योगिक वसाहती होत्या. आता नव्याने धुळेअतिरिक्त नरडाणा, सोनगीर, ब्राह्मणवेल, नंदुरबार, भालेर व नवापूर, साक्री अशा नववसाहती निर्माण झाल्या आहेत. नंदुरबारमध्ये पूर्वी छोट्या स्वरूपात रनाळा येथे औद्योगिक वसाहत स्थापन झाली होती. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळला नाही.

मात्र नवापूरमध्ये गुजरात रेल्वेलाइनला लागून असल्याने गुजरातमधील टेक्स्टाइल उद्योगाबरोबर पॉलिफिल्म कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. आता या ठिकाणी जागा नसल्याने याच रेल्वेलाइनला लागून असलेल्या नंदुरबारशेजारी भालेरमध्ये सुमारे तीनशे हेक्टर जमिनीवर नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करत थेट तापीतून पाइपलाइन व पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.

अनेक मोठ्या कंपन्यांनी भूखंड घेतले आहेत. याच ‘एमआयडीसी’त नंदुरबार येथील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही मोठा प्रकल्प साकारण्याचा ध्यास घेत शासन पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. तर धुळेबरोबर नरडाणा व सोनगीर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नवीन कंपन्यांचे जाळे निर्माण होत असून, सिमेंटबरोबर खाद्यतेल व इतर क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी चागंलाच वेग धरल्याचे पाहायला मिळते.

तरुणांच्या नजरा

जळगावमध्ये औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय जाहीर केले आहे. यामध्ये अतिरिक्त जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, जामनेर, कुसुंबा या नववसाहती निर्माण झाल्या आहेत. तर चोपडा व भडगाव, पाचोरा या ठिकाणी नवीन औद्योगिक वसाहती प्रस्तावित आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील नवऔद्योगिक वसाहतींसाठी हजारो कोटींच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम ‘एमआयडीसी’ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर होत आहे. यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार असल्याने खासकरून धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांतील तरुणांच्या नजरा लागून आहेत.

"तीन वर्षांत नाशिकमध्ये गुंतवणुकीचा ओढा वाढला आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने करण्याचा प्रयत्न ‘एमआयडीसी’मार्फत केला जात आहे. येणाऱ्या वर्षात ही गुंतवणूक अधिक पटीने असेल. त्या दृष्टीने उद्योगमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू आहे." - नितीन गवळी, प्रादेशिक आधिकारी, नाशिक

"मुंबई, पुणे, नाशिक हा ‘गोल्डन ट्रँगल’ समजला जातो. त्याच धर्तीवर गुजरात व महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी रेल्वे, विमान व रस्ते यांचे मोठ्या प्रमाणावर जाळे खासकरून धुळे, नंदुरबार व जळगावमध्ये निर्माण होत असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विशेष लक्ष देत हजारो कोटींची ‘एमआयडीसी’नेही गुंतवणूक करत उद्योगासाठी पायाभूत सुविधा निर्माण करत उद्योगाला आकर्षित करण्याचे प्रयत्न आहेत." - नितीन पाटील, प्रादेशिक आधिकारी, धुळे

"गेल्या काही वर्षांत नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव आदी ठिकाणी नव्याने औद्योगिक वसाहती स्थापन करत असून, पायाभूत सुविधा अतिशय वेगाने वाढविण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकल्पांना गती दिली जात आहे. नवीन वर्षात यातील अनेक प्रकल्प कार्यान्वित होतील, तर काही झाले आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळेल." - बाळासाहेब झंजे, अधीक्षक अभियंता, नाशिक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT