Nashik News : दोन वर्षांनंतर रविवारी (ता.४) गोदावरी नदीला पूर आला. या पुराच्या पाण्यात ओझर येथील २९ वर्षीय युवक वाहून गेला असून, २४ तास उलटूनही अद्याप तो सापडलेला नाही. तर सोमवारी (ता.५) पूर ओसरला असला तरी, नदीपात्रातील काही रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत. असे असताना काही वाहनचालक या पाण्यात वाहने चालवून स्टंटबाजी करीत होते. नाशिक शहर आणि परिसरात तीन दिवस पावसाची संततधार सुरू होती. ( Tight security of police at Someshwar waterfall)
यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी (ता.५) पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी ओसरले. परंतु तरीही गोदाघाट पाण्याखालीच होता. पाण्याच्या प्रवाहालाही जोर होता. तरीही काही वाहनचालक या ठिकाणी पाण्यात वाहने चालवून स्टंटबाजी करीत असताना दिसून आले. गोदापात्रावरील गाडगे महाराज पुलाखाली पाणी होते.
तरीही त्या पाण्यातून काही दुचाकीस्वार, कारचालक आणि रिक्षाचालक धोकादायकरीत्या मार्गक्रमण करीत होते. काही दुचाकीस्वार तर केवळ स्टंटबाजी म्हणून पाण्यातून दुचाकी चालवून नेत होते. यातून या चालकांच्या जिवालाही धोका उत्पन्न होण्याची शक्यता होती. मात्र सेल्फी, मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी काही वाहनचालक नाहक नदीपात्रात स्टंट करीत होते. श्रावणमासातील पहिला श्रावणी सोमवार (ता.५) असल्याने सोमेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. (latest marathi news)
तसेच, सोमेश्वर धबधब्याचे नयनरम्य सौंदर्य व खळाळता धबधबा पाहण्यासाठी युवक-युवतींचीही गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून गंगापूर पोलिसांकडून सोमेश्वर धबधबा याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. धबधब्याच्या बॅरिकेटिंगजवळही फारसे कोणाला जाऊ दिले जात नव्हते. पूर ओसरला असला तरी धबधबा खळखळून वाहत असल्याने अनेकजण त्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपत होते.
मंदिराबाहेर वाहतूक कोंडी
कपालेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते बॅरिकेटींग करून बंद केलेले होते. तरीही पंचवटीतील गल्ली बोळातील रस्त्याने येणाऱ्या वाहनांमुळे याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, कपालेश्वर मंदिरात आलेल्या भाविकांनीही त्यांची वाहने पार्क केल्यानेही कोंडीची समस्या उद्भवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.