Shiv Sena taluk chief Pandurang Shelke, Meenal Patil, Vikram Borade, Sunil Kale etc. while distributing uniforms to the children of Zilla Parishad school in Patoda. esakal
नाशिक

Nashik Students Uniform : मोफत गणवेशाला अखेर मुहूर्त! येवल्यात 18 पैकी 9 केंद्रांत गणवेश वाटप सुरू

Latest Nashik News : तालुक्यातील २३६ जिल्हा परिषद शाळांमधील १६ हजार १०९ विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळण्यास सुरवात झाली आहे.१८ पैकी ९ केंद्रांत गणवेशाचे वाटप सुरु असून येत्या पंधरा दिवसात वाटप पूर्ण होईल.

सकाळ वृत्तसेवा

येवला : गतिमान सरकार अशी जाहिरात बाजी करणाऱ्या शासनाने यावर्षी लाडके भाचे दुर्लक्षित केल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणारे गणवेश आता पहिले टर्म संपून दिवाळीची सुट्टी लागण्याच्या तोंडावर वाटप सुरु केले आहे. तालुक्यातील २३६ जिल्हा परिषद शाळांमधील १६ हजार १०९ विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळण्यास सुरवात झाली आहे.१८ पैकी ९ केंद्रांत गणवेशाचे वाटप सुरु असून येत्या पंधरा दिवसात वाटप पूर्ण होईल. अर्थात आताही एकच गणवेश दिला जात आहे. (Distribution of school uniforms started)

शाळा सुरू होण्यासाठी नव्हे तर आता शाळेला सुट्टी लागण्यासाठी अवघा १५ दिवसांचा कालावधी उरला असताना समग्र शिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत गणेशाचे गुऱ्हाळ मात्र अजून थांबलेले नाही. यामुळे पहिल्या दिवशी गणवेश ही घोषणा हवेतच विरली आहे.

यावर्षी नव्याने आदेश काढत शासनाने नियमित व स्काऊट गाइड असे दोन गणवेश देण्याचे निश्चित केले आहे. नियमित गणवेशाची शिलाई बचत गटामार्फत सुरू असल्याचे उत्तर जूनपासून मिळत आहे. शाळा सुरु होऊन पाच महिने झाल्यानंतर शासनाने महिला बचतगटांकडून गणवेश देण्याला मुहूर्त शोधला आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे गणवेश शिवण्याचे काम चांदवड येथील अहिल्यादेवी महिला बचत गटाला १६ हजार गणवेशाचे काम सोपवले आहे. तालुक्यातील अर्ध्या केंद्रांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून तयार असून येत्या पंधरा दिवसात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेले असेल अशी माहिती गटशिक्षणाधिकारी कुसाळकर यांनी दिली आहे.

दुसऱ्या स्काऊटच्या गणवेशाचे कापड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे येत्या दोन दिवसात प्राप्त होणार आहे. प्रत्येक शाळेची शालेय शिक्षण समितीकडे हे कापड सोपविले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची मापे घेऊन समिती स्काऊटचा गणवेश त्यांच्या पातळीवर शिवणार आहे.

तालुक्यात दोन दिवसांपासून पाटोदा, सोमठाण देश केंद्रापासून गणवेश वाटपाला सुरवात आज झाली. पाटोदा केंद्रात शिवसेनेचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेतील शाळांना गणवेश वाटपाला सुरवात झाली. गणवेश मिळाल्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हसू दिसून आले. आता इतर शाळांतील विद्यार्थी आपली दिवाळी नव्या गणवेशात साजरा करतील असे चित्र आहे.

असे आहेत केंद्रनिहाय विद्यार्थी

केंद्र - मुले - मुली - एकूण

अंगणगाव - ५२५ - ५८० - ११०५

आंदरसूल - ३३३ - ४४१ - ७७४

भारम - ४३७ - ४३७ - ८७४

बोकटे - २६५ - ३०९ - ५७४

चिचोंडी - ४७६ - ४३१ - ९०७

देशमाने - ४९२ - ४८३ - ९७५

गवंडगाव - ४३१ - ४३९ - ८७०

जळगाव नेउर - ५१९ - ५०७ - १०२६

कुसमाडी - ४२३ - ४३६ - ८५९

नागडे - ४८८ - ५०६ - ९९४

नगरसूल - ३३६ - २९७ - ६३३

पाटोदा - ४९० - ५१६ - १००६

राजापूर - ६२७ - ६४६ - १२७३

सायगाव - ६६५ - ५७१ - १२३६

सावरगाव - ५०६ - ४८२ - ९८८

सोमठाण देश - ४९४ - ४८० - ९७४

येवला मुले - ४५ - ३२ - ७७

येवला उर्दू - ४८८ - ५१६ - ९६४

---------------------------------------------------------

एकूण - ८००० - ८१०९ - १६१०९

"बचतगटाकडून गणवेश शिलाई करून वाटप सुरू झाले आहे. तालुक्यातील अर्ध्या शाळांना आतापर्यंत गणवेश मिळाले आहेत. शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांच्यासह बचत गटाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच आहे." - पांडुरंग शेळके, तालुकाप्रमुख, शिवसेना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT