Toll employees along with Yatin Kadam, Bapusaheb Patil etc. while protesting to demand salary hike. esakal
नाशिक

Nashik News : वेतनवाढीसाठी टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन! पिंपळगावला 4 तासात शेकडो वाहनांचा मोफत प्रवास

Latest Nashik News : चार तास चाललेल्या आंदोलनानंतर टोलप्रशासनाने नमती भूमिका घेत कर्मचाऱ्यांचा मागण्या मान्य केल्या.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : दीड वर्षापासून कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पिंपळगाव टोलप्लाझाच्या प्रशासनाने रोखली होती. अडेलतट्टूची भूमिका घेणाऱ्या टोल प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता.२) आंदोलन करत टोल नाकावरील सर्व १२ लेन खुल्या करून दिल्या. चार तास चाललेल्या आंदोलनानंतर टोलप्रशासनाने नमती भूमिका घेत कर्मचाऱ्यांचा मागण्या मान्य केल्या. (Pimpalgaon Toll employees protest for salary)

दीड वर्षापासून टोल प्रशासनाने कर्मचाऱ्यांची वेतनवाढ दिली नाही. ती वेतनवाढ करावी, मासीक पगारी रजा मिळाव्या, वैद्यकीय विमा द्यावा या प्रमुख मागण्यासाठी टोलप्लावर कार्यरत असलेल्या दोनशे कर्मचाऱ्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, भाजप नेत बापूसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.२) अचानक दुपारी बाराला आंदोलनास सुरुवात केली.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करत टोलच्या सर्व बारा लेन खुल्या करून देत वाहनांना मोफत प्रवास घडवित आंदोलन अधिकच तीव्र झाले. आंदोलनात कामगार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग भडांगे, सुवर्णा बोरस्ते, मीनाक्षी गांगुर्डे, रामेश्‍वर भावसार, योगेश अहिरे, तानाजी ढोणे, शीतल जाधव, वैशाली रसाळ, भाग्यश्री चव्हाण आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते. (latest marathi news)

चार तासात टोल प्रशासना सरळ

आडमुठे धोरण घेणारे टोल प्रशासनाअखेर नमते घेत मासिक पगारात दीड हजार वाढ, वार्षिक ३६ पगारी रजा या प्रमुख दोन मागण्या मान्य केल्या.तर विमाबाबत सकारात्मक विचार करू अशी ग्वाही देत रितसर लेखी पत्र कर्मचाऱ्यांना दिले. यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

"वेतनवाढ होत नसल्याने दीड वर्षापासून कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत होती. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास प्रशासनाला भाग पाडले."- यतीन कदम, बापूसाहेब पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT