Tomato sold by Sanjay Wagh. Receipt of sale of tomatoes esakal
नाशिक

Nashik Tomato Rates Hike: टोमॅटोच्या दराला चढली लाली! पिंपळगाव बसवंतला 3 हजार 351 चा दर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tomato Rates Hike : टोमॅटोला येथील बाजार समितीत आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर मिळाला. वीस किलोच्या क्रेटला तब्बल तीन हजार ३५१ रुपये दराने व्यापाऱ्यांनी सौदा केला.

उच्चांकी दरामुळे ८५ क्रेट टोमॅटोतून शेतकऱ्याला सुमारे तीन लाख रुपये मिळाले. घाऊक बाजारात १६७ रुपये प्रतिकिलो असा भाव फुटल्याने किरकोळ बाजारात किलोभर टोमॅटोसाठी २०० ते २५० रुपये मोजावे लागण्याची चिन्हे आहेत. (Nashik Tomato Rates Hike price of tomatoes rose 3 thousand 351 to Pimpalgaon Baswant)

आशिया खंडातील टोमॅटोची राजधानी म्हणून पिंपळगाव बाजार समितीचा उल्लेख होता. टोमॅटोची काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदा हे पीक लखपती करणारे ठरत आहे. पिंपळगाव बाजार समितीत महिनाभरापासून टोमॅटोचा हंगाम सुरू झाला. महिनाभरात अवघ्या पाच हजार क्रेटची आवक झाली आहे.

परराज्यांत टोमॅटोला जोरदार मागणी वाढत आहे, पण आवक अत्यल्प असल्याने ती पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांची सौदा करताना जोरदार चढाओढ सुरू आहे. त्यातूनच आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जोपूळ (ता. चांदवड) येथील शेतकरी संजय नामदेव वाघ यांनी ८५ क्रेटमधून टोमॅटो विक्रीसाठी आणला. गोलाकार, कवडी फुटलेला दर्जेदार टोमॅटो खरेदीसाठी व्यापाऱ्यांची झुंबड उडाली. त्यात साईबाबा आडतमधील नाजीम या व्यापाऱ्याने प्रतिक्रेटला तब्बल तीन हजार ३५१ रुपये असा भाव दिला.

१६७ रुपये किलो दराने घाऊक बाजारात टोमॅटोची खरेदी-विक्री होण्याची ही दुर्मिळ घटना घडली. संजय वाघ या शेतकऱ्याला उच्चांकी दरामुळे अवघ्या ८५ क्रेटमधून दोन लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

"उच्चांकी दर मिळाला, याचा आनंद आहे. पावसाचा अभाव, रोगांचे आक्रमण, संकटाशी झुंज देत टोमॅटोचे पीक घेतले आहे. त्या कष्टाचे चीज झाले. शेतकरी संकटात असताना टोमॅटोचा मोठा आर्थिक आधार मिळतो आहे." - संजय वाघ, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT