Nashik Godaghat & Misal esakal
नाशिक

Summer Vacation: सुटीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले नाशिककडे! धार्मिक पर्यटनासह निसर्ग अन् खाद्य भ्रमंतीकडे पर्यटकांचा कल

Nashik News : विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपत आल्या अन् उन्हाळी सुटीचा आनंद घेण्याचा प्लॅन घरोघरी ठरू लागलाय.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपत आल्या अन् उन्हाळी सुटीचा आनंद घेण्याचा प्लॅन घरोघरी ठरू लागला. कुटुंबासह उन्हाळी सुटीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी देशभरात व परदेशात पर्यटकांनी प्रवास सुरू केला आहे. राज्यातदेखील सर्वच पर्यटनस्थळावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिकसह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पर्यटकांची पसंती मिळत असून धार्मिक पर्यटनासह निसर्ग अनुभूती अन् खाद्यभ्रमंतीसाठी राज्यभरातून पर्यटक नाशिकमध्ये दाखल होऊ लागले आहेत. (nashik Summer Vacation marathi news)

गोदा आरतीचे आकर्षण

रामायणातील उल्लेखानुसार प्रभू श्रीरामचंद्रांचे वास्तव्य राहिलेले पंचवटी, सीता गुंफा, दक्षिण गंगा म्हणून संपूर्ण देशात नावलौकिक असलेली गोदावरी, काळाराम मंदिर, कपालेश्वर महादेव मंदिर यासह अनेक धार्मिक स्थळांचा वारसा नाशिकमध्ये असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत.

वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदाकिनारी गोदा आरती केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभर प्रसार झाल्याने भाविकांमध्ये गोदाआरती अनुभवण्याची मोठी उत्सुकता असते. गोदाआरतीसाठी सायंकाळपासून गोदातीरावर भाविकांसह पर्यटकांची मांदियाळी भरते.

त्र्यंबकेश्वराजाचे दर्शन पूजा अन् ब्रह्मगिरी प्रदक्षिणा

आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. उन्हाळ्याच्या सुटीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ मोठ्या रांगा लागू लागल्या आहेत. यासह नारायण नागबली, कालसर्प योग शांती तसेच पितृदोष निवारण पूजा करण्यासाठी देशभरातील भाविकांनी सुटीचा कालावधी निवडल्याने त्र्यंबकेश्वर नगरीतील गुरुजींची लगबग पाहायला मिळत आहे. ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा पुण्यफलदायी मानली जाते. त्यामुळे २२ किमी अंतराची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा भाविक करत असून ट्रेकर्ससाठीही ब्रह्मगिरी पर्वत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. (latest marathi news)

कुलस्वामिनीच्या दर्शनाला भाविक दाखल

नाशिक जिल्ह्यात खानदेशवासीयांची कुलस्वामिनी आद्य शक्तिपीठ सप्तशृंगी देवी तसेच चांदवड येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविक येऊ लागले आहेत. नुकत्याच परीक्षा आटोपल्याने आपल्या पाल्याला पुढील दिशा मिळावी यासाठी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी, नवविवाहित जोडपे देवीच्या दर्शनसाठी येऊ लागले आहेत.

राज्याच्या सीमेलगत अन् नाशिकच्या जवळ असलेल्या सापुतारा पर्यटनासह बोटिंगचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक मंडळींनी गर्दी केली आहे. इगतपुरी परिसरात देखील निसर्ग सौदर्य अन् शहरातील धावपळीच्या जीवनापासून काही काळ विश्रांतीसाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे रिसॉर्ट, खासगी हॉटेलचे बुकिंग आतापासून फुल झाले आहेत.

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात निसर्गप्रेमींचा जथ्था

नाशिक जिल्ह्याचे नैसर्गिक वैभव म्हणजे नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य. सुटीमध्ये निसर्गाशी एकरूप होत त्याची अनुभूती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मिळावी या करिता अनेक कुटुंब प्रमुखांनी नांदुरमध्यमेश्वरची वाट धरली आहे. तसेच प्राणी, पक्षी मित्र, निसर्ग छायाचित्रकारांचा जथ्था नांदुरमध्यमेश्वरमधील निसर्गाची क्षणचित्र टिपण्यासाठी दाखल झाला आहे. (latest marathi news)

दुर्गप्रेमींचा नाशिककडे ओढा

धार्मिक तसेच निसर्ग सौंदर्यासाठी नाशिकची ओळख आहे. त्याचप्रमाणे नाशिकलादेखील गड किल्ल्यांचा इतिहास लाभला आहे. दुर्ग उन्हाळी सुटीत गड किल्ल्यांच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये दाखल होत आहेत. प्रामुख्याने अंकाई, अंजनेरी, मुल्हेर, रामशेज,

साल्हेर, हरिहर गड, भोरगड या किल्ल्यांवर मोठ्या संख्येने पर्यटक अन् दुर्गप्रेमी दुर्ग भ्रमंतीसाठी येत आहेत.

खाद्यप्रेमींची भ्रमंती

अनेकदा पर्यटक सुटीमध्ये खाद्यभ्रमंतीसाठी आपली ट्रीप प्लॅन करतात. नाशिकचे खाद्यवैभव खाद्य रसिकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. यात पहिल्या क्रमांकावर आहे नाशिकमधील मिसळ. मिसळ विक्रेत्यांनी गेल्या काही वर्षांत नाशिक मिसळ निर्मित अनोखी क्रांती घडविल्याने खास मिसळचा आस्वाद घेण्यासाठी देश विदेशातून पर्यटक नाशिकमध्ये दाखल होतात. तसेच साबुदाणा वडा, जिलेबी यासह मासांहाराची चवदेखील पर्यटक नाशिकमध्ये मोठ्या आवडीने चाखत आहेत.

"देवभूमी, मंत्रभूमी अन् निसर्गभूमी म्हणून नाशिक नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरते. तस वर्षभर नाशिकमध्ये पर्यटकांचे येणे- जाणे होते, मात्र सुटीच्या काळात ही संख्या दुपटी-तिपटीने वाढते."- सागर वाघचौरे, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT