Kajwa festival esakal
नाशिक

Kajwa festival 2024 : काजवा महोत्सवात पर्यटकांची नोंद; हिरडा, बेहडा व सादडा झाडांवर हजारोंच्या संख्येने काजवे

Nashik News : गडद अंधारात चमकणारे काजवे पाहून पर्यटकांच्या डोळ्यांची पारणे फिटली. हिरडा, बेहडा व सादडा यांसारख्या झाडांवर हजारोंच्या संख्येने काजवे दिसले.

सकाळ वृत्तसेवा

सर्वतीर्थ टाकेद : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ३० ते ३५ हजार पर्यटकांनी हजेरी लावली. गडद अंधारात चमकणारे काजवे पाहून पर्यटकांच्या डोळ्यांची पारणे फिटली. हिरडा, बेहडा व सादडा यांसारख्या झाडांवर हजारोंच्या संख्येने काजवे दिसले. (Tourist record at Kajwa Festival)

हे काजवे एका लयात लुकलुकले अन् झाडांवर जणू काही दिव्यांची माळच दिसावी, तसे दृश्य पर्यटकांना बघावयास मिळाले. काजवा महोत्सवासाठी हरिश्चंद्रगड, भंडारदरा, कळसूबाई घाटघर अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दर वर्षीप्रमाणे याहीवर्षी २५ मे ते १५ जून या कालावधीत काजवा महोत्सव होत आहे.

पहिल्याच दिवशी कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या मुरशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, कोलटेंभे, मुतखेल, शिंगणवाडी, लव्हाळवाडी परिसरात काजवे बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. या वर्षी काजवा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शांत काळ्याभोर अंधारात लुकलुकणाऱ्या काजव्यांचा आविष्कार बघण्यासाठी भंडारदरा परिसरात ३० ते ३५ हजार पर्यटकांनी हजेरी लावली.

दुपारी तीनपासून ते रात्री दहापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वन्यजीव विभागातर्फे ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. काजवा महोत्सवामुळे स्थानिक हॉटेल, टेंटधारकांसह रानमेवा विकणाऱ्या बेरोजगार आदिवासी बांधवांना चांगलाच रोजगार उपलब्ध झाला आहे. (latest marathi news)

वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, वनपाल एस. पी. लांडे, एच. एन. ईदे, डी. एस. मुठे, आर. जी. बुळे, आर. एस. कुवर, वनरक्षक तळपाडे, महेंद्र पाटील, व्ही. पी. चव्हाण, पी. व्ही. साळुंके, एफ. व्ही. भोये, जी. आर. आढळ, गुलाब दिवे.

संदीप पिचड, डी. आर. डंबाळे, व्ही. एस. खाडे, अनिता शिंदे, नीलेश पिचड, प्रकाश आढळ, राजेंद्र चौधरी, जी. बी. पालवे, आकाश धोंगडे व वन्यजीव विभागाचे सर्व कर्मचारी कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहनत घेत आहेत.

पर्यटकांना आवाहन

पर्यटकांनी काजवा महोत्सवाचा आनंद घ्यावा, काजवा महोत्सव बघण्यासाठी पर्यटक कुटुंबासह येतात. आपल्यामुळे कुणाच्या आनंदावर विरजण पडणार नाही, याची काळजी प्रत्येक पर्यटकाने घ्यावी, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT