सटाणा : साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा- ताहाराबाददरम्यान औंदाणे शिवारात इर्टिगा कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित्तहानी झालेली नाही. इर्टिगामध्ये चालकाव्यतिरिक्त कोणीही प्रवासी नसल्याने मोठी जीवित्तहानी टळली.
एअर बॅग ओपन झाल्यामुळे चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, सटाणा शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, तत्काळ शहर वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. (Nashik Tractor car accident near Aundane)
सोमवारी (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास साक्री- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर औंदाणे शिवारात हा अपघात घडला. कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने कारचालकाला आपल्यासमोर ट्रॅक्टर असल्याचा अंदाज आला नाही. त्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघात इतका भयानक होता की ट्रॅक्टरला धडक बसताच कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. ट्रॉलीमधील कांदा रस्त्यावर पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, अपघातातील कार विरगाव येथील असल्याचे सांगितले जात आहे. (latest marathi news)
महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
सोमवारी (ता. १५) पहाटे सटाणा शहरातून भरधाव जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून मोठा अपघात झाला. तर गेल्या आठवड्यात असाच अपघात हॉटेल दुर्गाजवळ झाला होता. त्या अपघातात सुद्धा कांद्याचे वाहन होते. सातत्याने अपघात होत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
सटाणा शहर वळण रस्त्याचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले होते. आधीच बाजार समित्या बंद आहेत, त्यात कुठेतरी खासगी ठिकाणी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीसाठी नेत असताना अपघात होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.