Traffic Management esakal
नाशिक

Nashik Traffic Management : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चोख बंदोबस्त

Nashik News : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘रमजान ईद’ गुरुवारी (ता. ११) असल्याने त्या पार्श्र्वभूमीवर भद्रकाली व त्र्यंबकरोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Management : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘रमजान ईद’ गुरुवारी (ता. ११) असल्याने त्या पार्श्र्वभूमीवर भद्रकाली व त्र्यंबकरोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रमजान ईदनिमित्ताने (Ramadan Eid 2024) भद्रकालीत गर्दी होऊ शकते. तर त्र्यंबकरोडवरील इदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठणमुळे गर्दी होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. (Nashik Traffic Management Change in route in background of Ramadan Eid by RTO marathi news)

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.११) सकाळी त्र्यंबकरोडवरील इदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण होणार आहे. यासाठी मोठ्यासंख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहे. त्यामुळे त्र्यंबकरोडवर मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे.

तसेच, दूध बाजार, चौक मंडई या परिसरातही खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. या साऱ्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणा सुरळीत असावी, यासाठी शहर वाहतूक विभागातर्फे गुरुवारी (ता. ११) सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.

प्रवेश बंद मार्ग

- दूधबाजार चौक ते फाळके रोड टी पॉईंट

- फाळके रोड टी पॉईंट ते चौक मंडई

- चौक मंडई ते महात्मा फुले पोलीस चौकी

- मुंबई नाका सिग्नल ते गडकरी सिग्नल

- सीबीएस सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल

- भवानी (मायको) सर्कल ते जलतरण तलाव सिग्नल

(latest marathi news)

पर्यायी मार्ग

- बादशाही कॉर्नरकडून दूधबाजारकडे जाणारी वाहतूक जुने भद्रकाली टॅक्सी स्टॅण्डकडून पिंपळचौक मार्गे त्र्यंबक पोलीस चौकी, गाडगे महाराज पुतळामार्गे इतरत्र

- फाळके रोड टी पॉईंट येथून फुले मार्केट, मौला बाबा दर्गाकडे जाणारी वाहतूक फाळके टी पॉईट येथून सारडा सर्कल - गंजमाळ - त्र्यंबक चौकी - पिंपळ चौक मार्गे

- फुले चौकातून चौक मंडईकडे जाणारी वाहतूक द्वारका सर्कल, टाळकुटेश्वर मार्गे

- मुंबई नाकाकडून गडकरी चौकाकडे जाणारी वाहतूक संदीप हॉटेलकडून गुरुद्वारा रोड मार्गे

- सीबीएसकडून त्र्यंबकनाकाकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नलमार्गे

येथे बॅरिकेटींग पॉईंट

- दूध बाजार चौक

- फाळके रोड टी पॉईंट

- चौक मंडई

- महात्मा फुले चौकी

- जलतरण सिग्नल

- मोडक सिग्नल

- गडकरी सिग्नल

- चांडक सर्कल

- सीबीएस सिग्नल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT