Officials of the traffic branch taking penal action through e-challan on a rickshaw obstructing traffic at Sunday Karanja. esakal
नाशिक

Nashik Traffic Police : वाहतुकीस अडथळा; रिक्षांवर धडक कारवाई! वाहतूक शाखेकडून रविवार कारंजा, शालिमार चौकात मोहीम

Nashik News : शहर गुन्हेशाखेच्या अंमलदारांनी गेल्या दोन दिवसांपासून नेहमीच कोंडी उद्‌भवणाऱ्या रविवार कारंजा, शालिमार चौकात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांविरोधात इ-चलानद्वारे दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Police : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच असते. परंतु या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यास कोंडी टाळता येऊ शकते. शहर गुन्हेशाखेच्या अंमलदारांनी गेल्या दोन दिवसांपासून नेहमीच कोंडी उद्‌भवणाऱ्या रविवार कारंजा, शालिमार चौकात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांविरोधात इ-चलानद्वारे दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. (Traffic obstruction action on rickshaws Campaign by Traffic Branch)

शहरातील काही चौकांमध्ये नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. प्रामुख्याने अशा ठिकाणी बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने आणि वाहतुकीला अडथळा ठरू शकणारी वाहनेच वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असतात.

असे असले तरी वाहतूक शाखेकडून नियमित कारवाई केली जात नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रविवार कारंजा आणि शालिमार चौकात सातत्याने शहर वाहतूक शाखेच्या अंमलदारांकडून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

रविवारी कारंजा याठिकाणी अशोकस्तंभाकडून येणारी वाहने मालेगाव स्टॅण्डकडे वळण घेतात. नेमक्या त्याच वळणावरती रिक्षाचालक बेशिस्तपणे प्रवाशांना घेण्यासाठी थांबतात. परंतु त्यामुळे पाठीमागून येणारी वाहने थांबून कोंडीची समस्या निर्माण होते. या चौकात नियुक्तीवर असलेल्या वाहतूक शाखेचे अंमलदारांनी अशा रिक्षाचालकांविरोधात इ-चलानद्वारे ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली.

पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे या ठिकाणी थांबणार्या रिक्षाचालकांनी पळ काढला. याप्रमाणेच, मालेगाव स्टॅण्डकडून रविवार कारंजाकडे येणाऱ्या वळणावर पुन्हा एका कारने अडथळा निर्माण केला. त्या कारवरही वाहतूक अंमलदाराने दंडात्मक कारवाई केली. (latest marathi news)

अशीच कारवाई शालिमार चौकातही करण्यात आली. वाहतूक शाखेचे अंमलदार सतर्क झाल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उदभवली नाही. तसेच,वाहतूकही सुरळीत राहिली. ऐरवी सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास याठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच असते.

एमजी रोडवर व्हावी कारवाई

शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या एम.जी. रोडवर नेहमीच वाहतुकीची समस्या असते. या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग असते. बऱ्याचदा वाहनांची पार्किंग दुहेरी रांग झाली की रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याठिकाणी पार्क केलेली वाहने बहुतांशी दुकानमालकांची असते.

त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने रस्त्यावर पार्क करावी लागतात. तर, टोईंगकडून अशा दुचाकी वाहनांची टोईंग केली जाते. परंतु चारचाकी वाहने त्याचठिकाणी राहतात. या रस्त्यावरही नियमित दंडात्मक कारवाई झाल्यास पार्किंग शिस्त वाहनचालकांना लागेल आणि वाहतूकही सुरळीत होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT