Garbage dump at CBS Chowk traffic police station esakal
नाशिक

Nashik News : वाहातूक पोलिस चौकी बनली कचरा कुंडी! स्मार्ट रोड वरील स्मार्ट शब्दालाच फारकत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वाहतूक पोलीस चौकीस कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. रात्री चौकी मद्यपीचे आश्रयस्थान बनल्याचे चित्र सीबीएस चौकातील वाहतूक पोलीस चौकीत दिसत आहे. स्मार्ट रस्त्यावरील या चौकीचे रुप बघता स्मार्ट शब्दालाच हरताळ फासला गेला आहे. उन्हाचा चटका आणि पावसापासून बचावासाठी सीबीएस सिग्नलवर नियुक्त वाहतूक पोलिसांसाठी चौकात पोलीस चौकी आहे. (Traffic police station became garbage pit)

याच चौकीत काही महिन्यांपूर्वी सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्पीड गनचे तात्पुरते कंट्रोल करण्यात आले होते. पण आता प्रात्यक्षिक झाल्यानंतर हा तात्पुरता कंट्रोल रूम हटविण्यात आला. चौकी मात्र तशीच असल्याने चौकीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. स्मार्ट आणि मॉडेल रस्त्यावर अशा प्रकारचे चित्र म्हणजे स्मार्ट या संकल्पनेला जणू हरताळ फासला आहे.

चौकीतच दारु पार्ट्या

चौकातून ये-जा करणारे नागरिक, भिकारी, मद्यपीनी यांनी कचरा टाकून चौकीला कचराकुंडीचे स्वरूप आणले आहे. रात्रीच्या अंधारात मद्यपी चौकीचा आधार घेत मद्याच्या पार्ट्या करतात. तेथेच मद्याच्या बाटल्या तेथेच फेकून निघून जातात. (latest marathi news)

चौकात नियुक्त वाहतूक पोलिसांचा सगळा दिवस चौकातील वाहातूक नियंत्रणाकडे जातो त्यामुळे चौकीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष आहे. दिवसेंदिवस चौकीत एवढा कचरा वाढला आहे की, जणू चौकी म्हणजे कचरा कुंडी झाली आहे. चौकीसह परिसरास बकाल स्वरूप आले आहे.

वापर तरी करा,

कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. पोलिसांकडून चौकीचा वापर केल्यास अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. त्यामुळे परिसरातील व्यवसायिक आणि नागरिकांकडून चौकीचा वापर करण्यात यावा. अन्यथा कायमस्वरूपी चौकी तेथून हटविण्यात यावी. अशी मागणी केली जात आहे.

तर दुसरीकडे चौकीची अशा प्रकारची परिस्थिती बघून नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या चौकात पोलीस नियुक्त असतात. अशा चौकातील चौकीकडे कुणाचेही लक्ष नाही. महापालिका सफाई कर्मचाऱ्यांकडूनही चौकटीतील कचरा उचलला जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT