Nashik Traffic Problem esakal
नाशिक

Nashik Traffic Problem : नाशिककरांची वाहतूक कोंडी! दक्षिण महाराष्ट्रासह मुंबईत जाण्याची वाट बिकट

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये नाशिक पहिल्या पाच शहरांमध्ये असले तरी पायाभूत सुविधांच्या बाबतीत मात्र नाशिकला अजून मोठा पल्ला गाठावा लागेल. अशी स्थिती शासकीय व प्रशासकीय यंत्रणेने आणून ठेवली आहे. सध्या नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी ८ ते १० तास, तर पुणे शहरात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागतात. (Traffic Problem due to population increase)

यावर नाशिक बाहेरच्या व्यक्तीचा विश्‍वास बसणार नाही, परंतु नाशिककर दररोज अनुभव सध्या घेत आहेत. समस्या सोडविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते लोकप्रतिनिधी मुग गिळून बसले आहेत. तर प्रशासनाने कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत दोन्ही मुद्दे गाजण्याची चिन्हे दिसतं आहे.

नाशिक ते मुंबई हे अंतर रस्ते मार्गाने १८० किलोमीटर आहे. रस्ते मार्गाने अंतर कापण्यासाठी कल्याणपर्यंत अडीच तास, ठाणे तीन तास, तर पुढे चार तास असा वेळ लागतो. परंतु हल्ली आठ ते दहा तास लागतात. त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी रेल्वे मार्गाचा पर्याय नाशिककरांना सोपा वाटतो. परंतु लोकसभा निवडणुका झाल्यानंतर रेल्वे मार्गाची बोंब सुरू झाली आहे. मनमाड ते कसारा हे अंतर गचके खात रेल्वे पार करते.

पुढे रेल्वे वाहतूक कशी आहे, त्यावर प्रवास अवलंबून असतो. पुण्याकडे जाताना राजगुरुनगर व चाकण येथे वाहतुकीतून मार्ग काढताना नाकीनऊ येते. तब्बल पाच तासांचा प्रवास करून पुणे गाठता येते. सुरत, अहमदाबादकडे जाण्यासाठी एकमेव रस्ते मार्गाने धरमपूर किंवा जव्हार, पेठ मार्गे जाता येते, परंतु अरुंद मार्गामुळे विलंब होतो. उत्तर भारतात रस्ते किंवा रेल्वे मार्ग मात्र अडचणीचा नाही.

परंतु बहुतांश नागरिकांचा प्रवास मुंबई, पुणे व तेथून पुढे अधिक प्रमाणात आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्यासाठी लागणारा वेळ स्मार्टसिटी किंवा वेगाने वाढणारे नाशिक या वाक्याला छेद देणारे आहे. यास सर्वस्वी राजकीय नेतृत्वाचा अभाव ही बाब कारणीभूत ठरतं आहे. लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही. प्रशासनाने कानावर हात ठेवले अशा परिस्थितीत नाशिककरांनी वाहतूक कोंडीतून कसा मार्ग काढायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (latest marathi news)

विलंबाची कारणे

- पुण्याकडे जाण्यासाठी एकमेव रस्ते मार्ग.

- राजगुरुनगर, चाकण येथे वाहतूक कोंडी.

- कसारा, आसनगाव, कल्याण फाटा ते ठाणे वाहतूक ठप्प.

- कसारापर्यंत रेल्वे प्रवास संथगतीने.

- नाशिकवरून मुंबई, पुणे विमानसेवा नाही.

"शासन दरबारी वाहतूक कोंडी सोडविता येत नसेल तर राजकीय इच्छाशक्तीत नाशिक मागे पडत असल्याचे उदाहरण आहे. वाहतुकीच्या अन्य पर्यायांचा विचार व्हावा. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला या विषयावर धारेवर धरावे." - सुरेश पटेल, संचालक, नाशिक फर्स्ट.

"मुंबई, पुणे मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी क्रेडाई मेट्रोच्या वतीने सरकारला साकडे घातले आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे लवकर व्हावी, समृद्धी महामार्गाचे उर्वरित काम पूर्ण व्हावे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने आराखडा तयार करताना मुंबई, पुणे वाहतूक कोंडीवरही विचार व्हावा." - कृणाल पाटील, अध्यक्ष, नाशिक क्रेडाई मेट्रो.

"मुंबई व पुणे प्रवास जिकरीचा झाला आहे. जवळचे अंतर असूनही मुंबईत पोचण्यासाठी दहा तास लागतात. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अडचण माहीत असूनही उत्तर देत नाहीत. समस्यांना प्रतिसाद मिळतं नाही. प्रगतीच्या बाबतीत नाशिक मागे पडतं असल्याची खंत आहे." - सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको.

"नाशिकहून विमानसेवा वाढविण्यासाठी चेंबर मार्फत प्रयत्न आहे. कुंभमेळ्यानिमित्त धार्मिक टुरिझमची मागणी आहे. त्याचबरोबर नाशिक-मुंबई प्रवासातील अडथळे दूर झाले पाहिजे. यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरु आहे." - ललित गांधी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT