Sunday towing of two wheelers. esakal
नाशिक

Nashik Traffic Rule Break : नो पार्किंगमधील वाहनांच्या टोईंगने बेशिस्तांना दणका! 4 दिवसात अडीच लाखांचा ठोठावला दंड

Traffic Rule Break : गेल्या वर्षभरापासून शहरात बंद असलेली नो-पार्किगमधील वाहनांची टोईंग पुन्हा सुरू झाल्याने बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच दणका बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Rule Break : गेल्या वर्षभरापासून शहरात बंद असलेली नो-पार्किगमधील वाहनांची टोईंग पुन्हा सुरू झाल्याने बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच दणका बसला आहे. महाराष्ट्र दिनापासून सुरू झालेल्या टोईंगमुळे गेल्या चार दिवसांमध्ये नो-पार्किंगमधील दुचाक्या, चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करताना वाहतूक शाखाने सुमारे अडीच लाखांचा दंड वसूल केला आहे. ( Towing of vehicles in no parking area hit unruly in city )

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या मार्च २०२३ पासून वाहनांच्या टोईंग करण्याची पद्धत बंद करण्यात आली होती. संबंधित ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली नव्हती आणि नवीन ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आली होती. परंतु संथ प्रक्रिया आणि नवीन ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे वर्षभरापासून शहरात नो-पार्किंगमधील वाहनांचा टोईंग होत नव्हती.

परंतु त्यामुळे शहरात बेशिस्त पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यातच, वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीच्या समस्या होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत होता. परिणामी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर्वीच्या टोईंग ठेकेदारास मुदतवाढ दिल्याने महाराष्ट्र दिनापासून (ता. १) पुन्हा शहर आयुक्तालय हद्दीमध्ये टोईंग सुरू झाली आहे. अचानक टोईंग सुरू झाल्याने बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच दणका बसला आहे.

नो-पार्किंगचा फलक असलेल्या मार्गांवर पार्क केलेल्या दुचाक्या, चारचाकी वाहनांची टोईंग होऊ लागली आहे. तर, नो-पार्किंग आहे, परंतु त्याठिकाणचा फलक नाहीसा झाला वा नाही अशाठिकाणी महापालिकेने तत्काळ नो-पार्किंगचे फलक लावावेत असे पत्रच शहर वाहतूक शाखेतर्फे महापालिकेच्या संबंधित विभागाला देण्यात आलेले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नव्याने नो-पार्किंगचे फलक लावले जाणार आहेत.

अडीच लाखांचा दंड

शहर पोलीस वाहतूक शाखेने गेल्या चार दिवसांमध्ये नो-पार्किंगमधील दुचाक्या-चारचाक्या वाहनांची टोईंग करीत २ लाख ३५ हजार ६४० रुपयांचा दंड वसुल केला आहे. यामध्ये २५१ दुचाक्या आणि १०३ चारचाक्या वाहनांचा समावेश आहे.

टोईंग कारवाई

तारीख.... दुचाकी......चारचाकी

१ मे.........६५.......२०

२ मे.........००.......२५

३ मे.........८७........२८

४ मे.........१०४.......३०

एकूण.......२५१.......१०३

दंड.........१ लाख ४८ हजार ९० रुपये........८७ हजार ५५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT