Nashik ZP esakal
नाशिक

Nashik ZP News : संजय पाटील यांची बदली जि. प. प्रशासनाच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत तक्रार होऊन गाजलेल्या ग्रामविकास अधिकारी संजय पाटील (दिव्यांग) यांची बदली जिल्हा परिषदेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सदर बदलीची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने प्रशासनाला अहवाल सादर केला. या अहवालात पाटील यांनी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याचे बोलले जात आहे. (Nashik zp marathi news )

त्यामुळे संबंधित पाटील तसेच बदली प्रक्रिया राबविलेल्यांविरोधात आता प्रशासक काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय भावसिंग पाटील असे या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव असून, सध्या ते सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीत नेमणुकीस आहेत. यापूर्वी ते दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे नेमणुकीस होते.

तेथून बदली करण्यासाठी त्यांनी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातून स्वतःला डोळ्यांचे दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. जिल्हा परिषदेनेही सहानुभूतीने त्यांच्या अर्जाचा विचार करून बदली केली होती. दरम्यान, पाटील यांनी डोळ्यांच्या दिव्यांगत्वाचा खोटा दाखला सादर केल्याची तक्रार झाली होती. या संदर्भात ओरड होऊन चौकशीची मागणी झाली होती.

त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी समितीची नियुक्ती केली. या समितीत बदली प्रक्रिया राबविलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश केल्याने चौकशी समिती वादात सापडली होती. असे असतानाही समितीने चौकशी केली. यात पाटील यांनी सादर केलेला जे. जे. रुग्णालयाच्या दिव्यांगत्वाचा दाखला सत्यता पडताळणी करण्यासाठी पाठविला.

यात जे. जे. रुग्णालयाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला संजय पाटील यांना शून्य टक्के दिव्यांगत्व असल्याचे सांगत रुग्णालयाचा मूळ दाखलाही जिल्हा परिषदेला पाठविल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाटील यांनी बदलीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, चौकशी समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात नेमके काय दडले, याकडे लक्ष लागले. पाटील यांचे जिल्हा परिषदेच्या काही आजी-माजी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यानेच त्यांना पाठीशी घातले जात असल्याची चर्चा आहे.

कारवाईची मागणी

एकीकडे बदलीसाठी दिव्यांगांचे बनावट प्रमाणपत्र जोडल्याने शिक्षकावर थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केली होती. याच धर्तीवर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर, तसेच ही बदली प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेविरोधात कारवाई करण्याची मागणी दिव्यांग संघटनांनी केली आहे. ( latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT