Police Transfer esakal
नाशिक

Nashik Police Transfer: बदल्या झालेले अधिकारी हजर होईना! कामांचा होतोय खोळंबा; महासंचालक कार्यालयाकडून सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Transfer : राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर होऊन महिनाभराचा कालावधी उलटत आला आहे. मात्र अद्यापही बहुतांशी अधिकारी हे नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. परिणामी, कामांचा खोळंबा होऊन अतिरिक्त कामाचा बोजा वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस आयुक्त, अधीक्षकांना बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यासंदर्भातील आदेश जारी केलेले आहेत. (Nashik transferred police officers will not appear Work getting interrupted)

लोकसभेची आचारसंहिता संपताच महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले होते. यात राज्यातील ३७९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे तीन आठवड्यांपूर्वी सहायक आयुक्त तथा उपअधीक्षकांच्याही बदल्यांचे आदेश जारी झाले. परंतु या बदल्यांना महिनाभराचा कालावधी उलटत आला असला तरी अद्याप बहुतांशी अधिकारी हे त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत.

यामुळे नियुक्तीच्या ठिकाणी कामांचा खोळंबा कायम असून काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू असताना अधिकारीच हजर न झाल्याने नियोजनासंदर्भात अडचणी उद्‌भवत आहेत. तसेच, अतिरिक्त कामाचा बोजाही अन्य अधिकार्यांकडे सोपवावा लागत आहे.

या साऱ्या बाबींचा तपशीलवार माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडे राज्यभरातून आलेली आहे. त्याची गांभीर्याने दखल प्रशासनाच्या अपर महासंचालकांनी घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना त्यांच्याकडील बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे व कार्यमुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश जारी केलेले आहेत. (latest marathi news)

आयुक्तालयास प्रतिक्षा

शहर पोलिस आयुक्तालयात ७ पोलिस निरीक्षकांची नियुक्तीने बदली करण्यात आली. मात्र, त्यापैकी केवळ काही अधिकारीच हजर झाले आहेत. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डॉ. अंचल मुदलग, ठाणे बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे जयंत शिरसाट, दहशतवादी विरोधी पथकाचे सचिन खैरनार, राज्य गुप्त वार्ता विभागाचे (एसआयडी) विश्वजीत जगताप, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे संजीव फुलपगारे, जातप्रमाणपत्र तपासणी समितीचे अतुल डहाके, नागपूरचे जग्वेंद्रसिंग राजपूत यांची नाशिक शहर आयुक्तालयात नियुक्ती केली आहे. त्यापैकी सचिन खैरनार, जयंत शिरसाठ व अतुल हडाके हेच हजर झाले उर्वरित निरीक्षकांना कार्यमुक्त न केल्याने ते अद्याप आयुक्तालयात हजर झालेले नाहीत.

सहायक आयुक्तही...

मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयातून सहायक आयुक्त पद्मजा बढे-चव्हाण, महाराष्ट्र पोलिस अकादमीतून संगीता निकम या नाशिक आयुक्तालयात हजर झाले. परंतु, सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील उपअधीक्षक अनुराधा उदमले, मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक सुधाकर सुराडकर यांची मात्र प्रतिक्षा कायम आहे. असेच चित्र राज्यातील बहुतांशी आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT