Police Transfers esakal
नाशिक

Nashik Police Transfers : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! काही प्रभारींवर विश्वास, काही नियंत्रण कक्षात

Nashik News : शहर पोलिस ठाण्यांमधील प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार काही प्रभारी निरीक्षकांना नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर पोलिस ठाण्यांमधील प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार काही प्रभारी निरीक्षकांना नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली. काही प्रभारींना दुसऱ्या पोलिस ठाण्यांचा पदभार सोपवत वरिष्ठांनी विश्वास दर्शविला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या जाहीर केल्या आहेत. (transfers of police officers in charge of city police stations)

प्रशासकीय कारणामुळे या बदल्या करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, नाशिक रोडचे प्रभारी निरीक्षक रामदास शेळके, म्हसरूळचे प्रभारी सुभाष ढवळे, सातपूरचे प्रभारी सोहन माछरे यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. गंगापूरच्या प्रभारी तृप्ती सोनवणे यांच्याकडे नाशिक रोड पोलिस ठाण्यात दुय्यम निरीक्षकपदी.

आडगावचे प्रभारी प्रवीण चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती दिली. अंबडचे प्रभारी दिलीप ठाकूर यांना गंगापूरचा पदभार दिला आहे. अंबडमधील दुय्यम निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे अंबडच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. मुंबई नाक्याचे प्रभारी अशोक गिरी यांना नाशिक रोडची धुरा सांभाळण्यास देण्यात आली आहे.

उपनगरचे दुय्यम निरीक्षक रणजित नलावडे यांच्याकडे सातपूरचा पदभार सोपविण्यात आला. भद्रकालीचे दुय्यम निरीक्षक संतोष नरुटे यांना मुंबई नाका पोलिस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे. मुंबई नाक्याचे दुय्यम निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांची भद्रकालीत दुय्यम निरीक्षकपदी बदली करण्यात आली. (latest marathi news)

आर्थिक गुन्हे शाखेतील कुंदन जाधव यांची सरकारवाडा पोलिस ठाण्यात दुय्यम निरीक्षकपदी बदली झाली आहे. विशेष शाखेतील दुय्यम निरीक्षक सुशीला कोल्हे यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

नवीन अधिकाऱ्यांना संधी

नुकतीच बदली होऊन आलेल्या नाशिक आयुक्तालयातील डहाके यांच्याकडे म्हसरूळचा वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. सचिन खैरनार यांना आडगावचा पदभार देण्यात आला. जयंत शिरसाठ यांना उपनगर पोलिस ठाण्यात दुय्यम निरीक्षकपदी जबाबदारी देण्यात आली आहे. सुशील जुमडे यांना पंचवटी पोलिस ठाण्यात दुय्यम निरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली.

सहाय्यक, उपनिरीक्षकांच्याही बदल्या

पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक आणि उपनिरीक्षक अधिकाऱ्यांच्याही विनंती व प्रशासकीय कारणास्तव बदल्या झाल्या आहेत. त्यात सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ यांची मुंबई नाका पोलिस ठाण्यात, जया तारडे यांची टेक्निकल अॅनालिसीस विंग येथे बदली झाली; तर उपनिरीक्षक सुवर्णा महाजन व पंडित अहिरे यांची पीसीबी येथे, बळवंत गावित यांची म्हसरूळ पोलिस ठाण्यात, राकेश न्हाळदे यांची सातपूरला, सचिन चव्हाण यांची पंचवटीत व प्रवीण देवरे यांची देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT