Iqbal Bale Motiram Sonawane esakal
नाशिक

Nashik News : गिरणेच्या पुरात अडकलेल्यांनी जीव मुठीत धरुन काढली रात्र

जलील शेख

Nashik News : गिरणा नदीत पुराच्या पाण्याचा जोर वाढत होता. पाणी वाढण्याबराबरच पाण्याचा आवाजही वाढत होता. पुराच्या पाण्यात अडकलेल्या पंधरा जणांच्या मनात भिती पसरली होती.किर्र अंधारात रात्रभर खडकावर उभे राहून समोर मृत्यू दिसत असताना केवळ प्रार्थना करून बिकट अवस्थेत २२ तास काढले. गिरणा नदी पात्रात अडकलेल्या पंधरा जणांचा अनुभव अंगावर थरकाप उडवणारा आहे. यासंदर्भात इकबाल बाले यांनी आपबिती सांगितली. ()

ते सवंदगाव व म्हाळदे शिवारातील गिरणा नदीत रविवारी (ता. ४) पात्रात दुपारपासून सुमारे पंधरामासेमार मासे पकडण्यासाठी गेले होते. अचानक पाचला पाण्याचा प्रवाह वाढल्याने सर्व जण पाण्यात अडकले. यात एकबाल बाले यांनी किल्ला झोपडपट्टी भागातील माजी नगरसेवक साजीद अन्सारी यांच्यासोबत व आमदार मुफ्ती इस्माईल यांनी धीर दिल्याने त्यांना आधार मिळाला. अडकलेल्या पाण्यातून काढण्यासाठी एसडीआरएस व अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवापाड मेहनत घेतली.

मुलांचे रडणे...

पंधरा जणांत ४ जण धुळे तर ११ मालेगाव येथील होते. यात दोघे सख्खे भाऊ दिव्यांग होते. रात्र वाढत होती तसे पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. काहींना कुटुंबीयांचे फोन येत होते. अडकलेल्यांची मुले फोनवर रडायची. त्यामुळे त्यांच्या भावना अनावर होत होत्या. तब्बल १९ तासानंतर त्यांना जिलेबी व भजीचा नाष्टा मिळाला. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हेलिकॉप्टर आल्याने सर्वांना आनंद झाला.

म्हाळदे ग्रामस्थांची साथ

अडकलेल्यांना माजी सरपंच आण्णा बोरसे यांच्यासह म्हाळदे ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले. म्हाळदे येथील मासेमार करणारे मोतीराम सोनवणे यांनी जिवाची पर्वा न करता १५ जणांपर्यंत सकाळी अकराला जिलेबी व भजीचा भर पाण्यात ट्युबवर बसून नाश्‍ता दिला.

''वयाच्या तेरा वर्षापासून मासे पकडायला धरणात जात आहे. ३० वर्षाचा अनुभव असल्याने मोठ्या पाण्यातूनही सहज निघण्यासाठी इतर १४ जणांना रात्रभर धीर दिला. मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. धीर दिल्याने १४ जणांचा आधार बनलो.''- एकबाल बाले, पुरात अडकलेले

''पाण्यात मध्यभागी अडकलेले १९ तासापासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नसल्याने नाश्‍ता पोहोचविण्यासाठी त्यांच्यापर्यंत पाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. तेथे गेल्यानंतर त्यांना धीर दिल्यामुळे त्यांना आधार मिळाला.''- मोतीराम सोनवणे म्हाळदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT