Nashik News : गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत आदिवासी विकास विभागाकडून विविध १९ संवर्गातील ६०२ पदांसाठी मेगा भरती राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १३ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु सुरू केलेली पदभरती प्रक्रिया स्थगित करत मराठा आरक्षणासह (एसईबीसी) नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. (Tribal Development Department Recruitment postponed)
त्यामुळे ही पदभरती जाहिरात तूर्त स्थगित करण्यात आली असल्याचे आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी शासकीय प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे. राज्यात आदिवासी विकास विभागाची चार अपर आयुक्तालये असून, त्या माध्यमातून दैनंदिन कामकाज चालते. सरळसेवा भरती-२०२३ अंतर्गत आयुक्तालयात १६, नाशिक अपर आयुक्तालयात १६६, ठाणे अपर आयुक्तालयात १४५.
अमरावती अपर आयुक्तालयात ८३, तर नागपूर आयुक्तालयात १९२ पदे भरण्यात येणार आहेत. यात उच्च श्रेणी लघुलेखक- ०३, निम्न श्रेणी लघुलेखक- १३, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक- १४, संशोधन सहाय्यक- १७, उपलेखापाल/मुख्य लिपिक- ४१, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक- १८७, लघुटंकलेखक- ५, गृहपाल (पुरुष)-४३, गृहपाल (स्त्री)- २५, अधीक्षक (पुरुष)- २६, अधीक्षक (महिला)- ४८, ग्रंथपाल- ३८.
प्रयोगशाळा सहाय्यक- २९, आदिवासी विकास निरीक्षक- ८, सहाय्यक ग्रंथपाल- १, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी)- २७, माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी)- १५, उच्च माध्यमिक शिक्षणसेवक- १४, प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी)- ४८ यांचा समावेश होता. आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावरून या पदभरती जाहिरातीनुसार २३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. (latest marathi news)
विविध पदांकरिता उमेदवारांचे अर्जही ऑनलाइन प्राप्त झाले होते. तथापि २६ फेब्रुवारी २०२४ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करून त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करून गट ‘क’ संवर्गासाठी जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आले आहे.
त्यामुळे ही जाहिरात तूर्त स्थगित करण्यात आली असून, याची उमेदवारांनी नोंद घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे. तसेच, याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुन्हा बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येणार असल्याचे अर्ज भरलेल्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असेही विभागाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.