Teacher Recruitment esakal
नाशिक

Nashik News: आदिवासी तालुक्यांना मिळाले 311 शिक्षक! जि.प. प्राथमिक विभागाकडून नियुक्तीपत्र; पेसा क्षेत्रात कंत्राटी भरती

Latest Nashik News : राज्यातील आदिवासी (पेसा) क्षेत्रातील म्हणजे तब्बल १३ जिल्ह्यातील शिक्षक भरती न्यायालयीन प्रकरणांमुळे रखडल्याने शिक्षण विभागाने आता यावर, कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आदिवासी (पेसा) क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी (ता. ८) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ३११ शिक्षकांना नियुक्ती पत्र दिले. यात ९४ शिक्षक विज्ञान, गणित विषयांसाठी तर, २१७ शिक्षक प्राथमिक शाळांसाठी देण्यात आले. (Tribal talukas got 311 teachers Appointment)

राज्यातील आदिवासी (पेसा) क्षेत्रातील म्हणजे तब्बल १३ जिल्ह्यातील शिक्षक भरती न्यायालयीन प्रकरणांमुळे रखडल्याने शिक्षण विभागाने आता यावर, कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने भरती करावी, असे परिपत्रक राज्य शासनाने मागील महिन्यात काढले.

यात ‘पेसा’ क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पध्दतीने करण्याचे निर्देश दिले. या भरती प्रक्रियेत निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास नव्याने निवड प्राप्त उमेदवाराला दरमहा २० हजार रुपयांचे मानधन देण्याची तरतूद केली आहे. निवृत्त शिक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेली पावित्र पोर्टलवरील स्थानिक पेसामधील मेरीटनुसार गुणवत्ता विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द केली. (latest marathi news)

यातील पात्र विद्यार्थ्यांची पडताळणी करून अंतिम यादी प्रसिध्द करत, उमेदवारांकडून कागदपत्रे मागविली. १५ दिवसांपासून या कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. अखेर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शिक्षकांची यादी प्रसिध्द केली. मंगळवारी शिक्षणाधिकारी नितीन बच्चाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या उपस्थितीत शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक शिक्षक

दरम्यान, आदिवासी तालुकानिहाय शिक्षकांची नियुक्ती बघता सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक ११२ शिक्षकांना नियुक्ती मिळाली आहे. यानंतर, त्र्यंबकेश्वर ४८, पेठ ३५, नाशिक ३, इगतपुरी २८, दिंडोरी २९, कळवण ३७, देवळा ३, बागलाण २० शिक्षकांना नियुक्ती मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT