teacher esakal
नाशिक

Nashik Tribal Areas Teacher: आदिवासी तालुक्यांना मिळाले 559 शिक्षक! ZP प्राथमिक विभागाने पुन्हा दिल्या 248 शिक्षकांना नियुक्त्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tribal Areas Teacher : आदिवासी (पेसा) क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागांची ओरड आता कमी होणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यातील प्राथमिक शाळांना आठवडाभरात तब्बल ५५९ शिक्षक मिळाले आहेत. पेसा क्षेत्रातील भरतीनंतर प्राथमिक शिक्षण विभागाने राज्य शिक्षण विभागाची परवानगी घेऊन पुन्हा २४८ शिक्षक पेसा क्षेत्रात दिले. या शिक्षकांना सोमवारी (ता. १४) रात्री उशिरा नियुक्त्या देण्यात आल्या. (Tribal talukas got 559 teachers)

राज्यातील आदिवासी (पेसा) क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षक/मानधनावर नियुक्ती भरतीचा मार्ग काढला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असे परिपत्रक राज्य शासनाने काढले.

यात ‘पेसा’ क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले. त्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेली पावित्र पोर्टलवरील स्थानिक पेसामधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली. यातील पात्र विद्यार्थ्यांची पडताळणी करून अंतिम यादी प्रसिद्ध करत, उमेदवारांकडून कागदपत्रे मागविली.

या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर गेल्या आठवड्यात शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या उपस्थितीत ३११ शिक्षकांना नियुक्तिपत्र दिले. यात ९४ शिक्षक विज्ञान, गणित विषयांसाठी, २१७ शिक्षक प्राथमिक शाळांसाठी देण्यात आले होते. या भरतीनंतरही रिक्त जागांचे प्रमाण मोठे होते. (latest marathi news)

त्यावर शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी राज्य शिक्षण सचिव यांना पत्र देत पेसा क्षेत्रातील रिक्त जागा अधिक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत मार्गदर्शन मागविले होते. त्यावर, राज्य शिक्षण सचिव यांनी पुन्हा कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्यास परवानगी दिली. त्यानंतर शिक्षण विभागाने पोर्टलवरून प्राप्त झालेल्या यादीतील पडताळणी झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली. यात २४८ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे.

तालुकानिहाय मिळालेले शिक्षक

पेठ (२२), सुरगाणा (६८), दिंडोरी (५१), कळवण (२७), बागलाण (८), त्र्यंबकेश्वर (४७), इगतपुरी (१८), नाशिक (७).

"आदिवासी तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात होत्या. मात्र, शासनाने दिलेल्या आदेशानुसार ५५९ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामुळे या भागातील शैक्षणिक गुणवत्तावाढीला मोठी मदत मिळणार आहे."

- नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Sports News on 15th October 2024: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात ते कोल्हापूरच्या कन्येने जिंकले रौप्यपदक

Assembly Election: दोन वर्षांपासून गुजरात महाराष्ट्राला चालवत होता, आता जनताच न्याय करणार; मशाल धगधगणार! आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले

SCROLL FOR NEXT