SSC Exam Result esakal
नाशिक

SSC Exam Result : दहावीच्‍या निकालात त्र्यंबकेश्‍वरचे 98 टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण

Nashik News : दहावीच्‍या निकालात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍याचा सर्वाधिक ९८ टक्‍के निकाल लागला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मर्यादित स्‍वरूपाच्‍या भौतिक सुविधा असताना, शिक्षणासाठी प्रसंगी पायपीट करावी लागत असताना अन्‌ माळराणावरील कामे सांभाळून अभ्यास करणारी पोरं अभ्यासातही हुशार आहेत, हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले आहे. सोमवारी (ता. २७) जाहीर झालेल्‍या दहावीच्‍या निकालात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍याचा सर्वाधिक ९८ टक्‍के निकाल लागला. (Trimbakeshwar taluka got highest result of 98 percent in class 10th result)

याबरोबर पेठ, सुरगाणा, सिन्नरसारखा दुष्काळी परिसराचा निकाल लक्ष वेधणारा आहे. करिअरच्‍या दृष्टिकोनातून इयत्ता दहावीचे वर्ष महत्त्वाचे मानले जाते. म्‍हणून शहरी भागात शिकवणी लावण्यापासून तर अन्‍य विविध माध्यमांतून परीक्षांची तयारी केली जाते. तसेच, अभ्यास सामग्रीही मुबलक प्रमाणात शहरी भागात उपलब्‍ध होऊ शकते.

शाळेत ये-जा करण्यासाठी चांगले रस्‍ते, इतर सुविधांचीही कमतरता नसते. दुसरीकडे दुर्गम भागांमध्ये जसे-तसे शिक्षण सुरू ठेवण्यावर भर दिला जातो. शाळेपासून काही पाडे लांब असल्‍याने सायकलवर किंवा प्रसंगी पायी विद्यार्थी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करतात. दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांच्‍या कष्टाचे चीज झाल्‍याचे आकडेवारीतून तरी स्‍पष्ट होते.

कदाचित, शहरी भागातील विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीतून यश मिळविले असेल, भरघोस गुण मिळवत दहावी उत्तीर्ण झाले असतील; पण ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्‍या उत्तीर्णतेचा आनंद अधिक आहे. (latest marathi news)

नाशिक जिल्‍हास्‍तरावरील क्षेत्रनिहाय आकडेवारी अशी ः

तालुका उत्तीर्णांची टक्‍केवारी

चांदवड ९५.१९

दिंडोरी ९४.७६

देवळा ९६.९१

इगतपुरी ९५.५३

कळवण ९७.२०

मालेगाव ९५.०४

नाशिक ९४.३०

निफाड ९५.६५

नांदगाव ९२.५०

पेठ ९६.५५

सुरगाणा ९७.७८

सटाणा ९६.२६

सिन्नर ९६.००

त्र्यंबकेश्‍वर ९८.३७

येवला ९५.५३

मालेगाव मनपा ९०.०३

नाशिक मनपा ९६.४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT