Nashik News : मेहनत, चिकाटी, कष्ट परिस्थिती जाणीव, आवड, छंद हे स्तंभ यशाचे यशोशिखर गाठण्यासाठी शिडीसारखे पावलोपावली महत्त्वाची भूमिका निभावतात. या बळावर प्रतिकूल परिस्थितीतही अपेक्षित यश संपादन करतो, असाच अनुभव घंटागाडी कर्मचाऱ्यांची मुलगी तुळशी परदेशी हिने इतरांची धुणीभांडी करून माध्यमिक शालान्त परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. (Tulsi Pardeshi daughter topped school in her 10th examination)
वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस जिवाचे रान करून तसेच, आपल्या आरोग्याची, जिवाची परवा न करता इतरांच्या निरोगी आरोग्यासाठी झटणारे घंटागाडी कर्मचारी सुरेश परदेशी यांची मुलगी तुळशी परदेशी हिने विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवून कष्टकरी आईवडिलांचे स्वप्न साकार केले आहे.
सुरेश परदेशी यांना चार मुले तीन मुली व एक मुलगा असे मोठे कुटुंब आहे. मोठ्या मुलीचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून तिच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन आर्थिक परिस्थितीचा सामना करत असताना दुसऱ्या मुलीचे आणि मुलाचे अर्धवट शिक्षण ठेवून मुलाला सेंट्रींग कामावर पाठवून आर्थिक परिस्थिती नाही म्हणून त्याचे शिक्षण अर्धवट थांबवले. कुटुंबाला हातभार लावण्यास सुरवात केली.
आईने चार पैसे मिळतील या आशेवर धुणी भांडीचा व्यवसाय पत्करला. या कामात तुळशीने अभ्यास, शाळा सांभाळून आईच्या बदलीवर इतरांच्या घरची धुणी भांडी करून मिळेल तेवढ्या वेळेत आपली चित्रकलेची, रांगोळी मेहंदी व नृत्याची आवड जोपासली. (latest marathi news)
अभ्यासात सातत्य ठेवले कलाशिक्षक एस. आर. पवार यांच्या मार्गदर्शनातून शासकीय ग्रेड इंटरमिजिएट परीक्षेत विशेष प्रावीण्य ए श्रेणी प्राप्त करून त्याद्वारे ७ गुणांचा अतिरिक्त लाभ मिळवून ७१.४० टक्के गुण मिळवून केबीएच विद्यालय वडाळा शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
तुळशीला सीए व्हायचे असून त्यासाठी अधिक अभ्यास करेल असे तिने सांगितले. तिच्या या यशाबद्दल तिचे आदिवासी सेवा समितीचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्ष डॉ. स्मिता हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त संपदा हिरे, शालेय समिती अध्यक्षा योगिता हिरे, विश्वस्त अद्वय हिरे, सहसचिव राजेश शिंदे, सहसमन्वयक श्रीराम शिरसाट, मुख्याध्यापक संजय म्हसकर, पर्यवेक्षक इंद्रलाल देसले यांनी अभिनंदन केले आहे.
"घंटागाडीवर काम करतो आहे, मोठ कुटुंब असल्याने सर्वांच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. पण तुळशीच्या शिक्षणासाठी मी अजून जिवाचे रान करून तिला मोठे करण्याची इच्छा आहे." - सुरेश परदेशी, तुळशीचे वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.