BJP, NCP (Sharadchandra Pawar) esakal
नाशिक

Niphad Assembly Constituency : निफाडमध्ये कमळाचा सुगंध की तुतारीचा निनाद?

Nashik News : राज्यातील ढवळलेले वातावरण, त्याचा ‘इम्पॅक्ट’ निफाड विधानसभा मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

माणिक देसाई : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघांच्या तुलनेत सरस आहे. लोकसभेच्या रणांगणाची सुरवात होण्यापासूनच कांदा, द्राक्ष या प्रमुख उत्पादकांमधील शासनाप्रतीचा असंतोष उघडपणे व्यक्त झाला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने दिलेला बूस्टर डोसचा किती परिणाम झाला, ते ४ जूनला निकालाअंतीच स्पष्ट होईल. (Niphad Assembly Constituency)

निफाड मतदारसंघातील शेतकरी वर्गात असलेला असंतोष मतदानप्रसंगी कांदा, टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून व्यक्त झाला; परंतु यानिमित्त सत्तेचा काटेरी मुकुट कोणाच्याही शिरावर गेला तरी शासनाला कृषी धोरण ठरविण्यासाठी हा रोष माईलस्टोन बनल्यावाचून राहणार नाही, असे तालुक्यात बोलले जात आहे.

निफाड तालुका हा कांदा आणि द्राक्षाची पंढरी आहे, तसेच सहकाराचीही पंढरी आहे. राज्यातील ढवळलेले वातावरण, त्याचा ‘इम्पॅक्ट’ निफाड विधानसभा मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला. तालुक्यात ६४ टक्के मतदान झाले आहे महाविकास आघाडीतील पहिली सभा निफाड तालुक्यात झाली.

या वेळी कोसळलेल्या शेतमालाच्या भावामुळे शेतकऱ्यांत असलेला रोष पाहायला मिळाला. दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत निफाड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार अनिल कदम, तर महायुतीतर्फे आमदार दिलीप बनकर यांनी प्रचाराचा राळ उठवला. या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेची जणू लिटमट टेस्ट पाहायला मिळाली; परंतु या वेळी शेतीमाल सोडून कुठलाही स्थानिक प्रश्न चर्चेत आढळलाच नाही. (latest marathi news)

या वेळेस कांदा व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांव्यतिरिक्त कुठलीच लाट दिसली नाही. महाविकास आघाडीतर्फे भास्कर भगरे, तर महायुतीच्या डॉ. भारती पवार यांच्यात चुरस पाहायला मिळाली. ग्रामीण भागात महाविकास आघाडी, तर शहरी भागात महायुतीचा जोर पाहायला मिळाला. आपला उमेदवार निवडून येण्यासाठी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी जोर लावला.

यंदाच्या निवडणुकीत कांदा व टोमॅटोसह शेतमालाचे पडलेले भाव, तसेच राष्ट्रीय मुद्दे- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील मोफत रेशन, किसान सन्मान योजना आणि राष्ट्रासाठी मतदान यावरही मतदारांनी आपले मत नोंदविले. अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीचा इम्पॅक्ट विधानसभा निवडणुकीवर निश्चित पडणार असल्याने ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे आता निफाडकरांचे लक्ष लागले आहे.

झालेले मतदान

पुरुष- १,०४,१३१

स्त्री- ८३,२९४

एकूण- १,८७,४२५

मतदान- ६४.३७ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT