Industries Minister Uday Samant while speaking at the program of Udyog Bharari of Maharashtra esakal
नाशिक

Nashik News : दोन वर्षांत 33 हजार नवउद्योजक : उदय सामंत; उद्योग विभागामार्फत 10 हजार 500 कोटींचे अनुदानवाटप

Latest Nashik News : उद्योगस्नेही धोरणामुळे राज्यात सर्वांत जास्त ७५ हजार कोटींची परकीय गुंतवणूक आल्याने जगातील गुंतवणूकदार महाराष्ट्रासाठी आकर्षित होत असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सातपूर येथील ‘उद्योगभरारी’ कार्यक्रमात केला.

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : गेल्या दोन वर्षांत महायुतीचे शिंदे, फडणवीस व पवार सरकारने उद्योग विभागामार्फत सुमारे ३२ हजार सातशे नवउद्योजक तयार करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. यात मोठा प्रमाणावर तरुणांचा स्टार्टअपचा समावेश केला आहे. ऐवढेच नाही तर या दोन वर्षांत उद्योजकांना सुमारे दहा हजार ५०० कोटींचे अनुदानवाटप करण्यात आले आहे.

तसेच उद्योगस्नेही धोरणामुळे राज्यात सर्वांत जास्त ७५ हजार कोटींची परकीय गुंतवणूक आल्याने जगातील गुंतवणूकदार महाराष्ट्रासाठी आकर्षित होत असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सातपूर येथील ‘उद्योगभरारी’ कार्यक्रमात केला. (33 thousand new entrepreneurs in two years)

नाशिकच्या सातपूरमध्ये गुरुवारी (ता. ३) उद्योगभरारी कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, अजय बोरस्ते, विजय करंजकर, संजय सोनवणे, शशिकांत जाधव आदींसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे, प्रादेशिक आधिकारी नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

सावंत म्हणाले, की राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, उद्योजकांना दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा आणि औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली आहे. उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत भरारी घेत प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा सामंत यांनी केला.

अंबड औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी व्यवस्थापनासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी काळात जिल्ह्यात लवकरच मोठा प्रकल्प येईल, असेही त्यांनी सांगितले. (latest marathi news)

कृषीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असून, मोठ्या उद्योजकांबरोबरच लघुउद्योगांनाही कर्जपुरवठा करण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत. राज्यातून कोणताही उद्योग बाहेर गेलेला नाही. नवी मुंबईतील महापे येथे जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क साकारण्यात येणार आहे. या वेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश आणि नियुक्तिपत्राचे वितरण करण्यात आले.

खासदार वाजे म्हणाले, की राज्याने औद्योगिक क्षेत्रात घेतलेली भरारी आनंदाची बाब आहे. उद्योग क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी विविध उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. गांधी म्हणाले, की गेल्या दोन वर्षांत राज्याने पुन्हा औद्योगिक क्षेत्रात भरारी घेतली आहे.

नवनवीन उद्योग आले आहेत. उद्योगांचे सक्षमीकरण होत आहे. नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित होत आहे ही समाधानाची बाब आहे. उद्योजकांना सन्मान मिळवून देण्याचे काम शासनाने केले आहे. बेळे म्हणाले, की औद्योगिक क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. शासनाकडून उद्योजकांना सकारात्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुळे यांनी प्रास्ताविक केले. प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT