Umbrellas for sale on Kidwai Road in Malegaon. esakal
नाशिक

Nashik News : छत्री, रेनकोट व्यवसाय ठप्प! पावसाअभावी ग्राहकांची पाठ

Nashik News : कसमादे परिसरात गेल्या वर्षी दुष्काळाचे सावट होते. त्यामुळे येथे छत्री व रेनकोट व्यवसाय ठप्प झाला आहे. यंदा जुलैच्या दुसरा आठवडा उलटला तरीही येथे छत्री व्यवसाय बहरला नाही.

जलील शेख

Nashik News : कसमादे परिसरात गेल्या वर्षी दुष्काळाचे सावट होते. त्यामुळे येथे छत्री व रेनकोट व्यवसाय ठप्प झाला आहे. यंदा जुलैच्या दुसरा आठवडा उलटला तरीही येथे छत्री व्यवसाय बहरला नाही. अनेक व्यावसायिक गेल्या वर्षीचा छत्री व रेनकोटचा माल कमी किंमतीत विकत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत छत्रीमागे २० रुपयांनी किमती घसरल्या आहेत. (Umbrella raincoat business stopped Customers back due to lack of rain)

अनेक व्यावसायिकांच्या गेल्या वर्षाच्या छत्र्या पडून खराब होत असल्याने शहरात ठिकठिकाणी ‘लाट का माल सस्तेमे’ विकला जात आहे. सर्वत्र पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे यंदा छत्री व्यवसायही मंदिच्या कचाट्यात सापडला आहे. अनेक व्यापाऱ्यांकडे गेल्या वर्षीच्या छत्र्या पडल्या होत्या. त्या छत्र्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. छत्रीत चार प्रकार आहेत. यात ८ काडी, १२ काडी तसेच फोल्डींग छत्री आहे.

यात सर्वात जास्त १२ काडीच्या छत्रीला मागणी असते. ही छत्री टिकाऊ व मजबूत असल्याने छत्रीला पसंती दिली जाते. छत्र्या रंगीबेरंगी असून, काळ्या कलरच्या छत्रीला मागणी राहते. येथे व्यावसायिक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ३० जूनपर्यंत छत्रीचा माल भरुन ठेवतात. यावेळी गेल्या वर्षीचा माल पडल्याने अनेक व्यावसायिकांनी नवीन माल खरेदी केला नाही. नवीन छत्र्यांच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या छञ्यांमुळे नवीन छञ्यांना उठाव नाही. त्यामुळे सर्वत्र छत्री व्यवसायाला घरघर लागली आहे. येथे जून ते सप्टेंबरपर्यंत छत्री, रेनकोट, टोपीला मागणी असते. येथे शंभर ते १२० रुपयाला छत्री विकली जात आहे. शहरात अनेक व्यापारी मुंबई येथील बंद पडलेल्या अनेक शोरुममधून छञ्या लॉटमधून आणून येथे ५० ते १०० रुपयाला रस्त्याच्या कडेला विक्री करतांना दिसत आहेत. (latest marathi news)

येथे मुंबई, इंदोर, दिल्ली या भागातून छत्रीचा माल येतो. छत्री पाठोपाठ येथे रेनकोट डबल, टिबल, पिव्हीसी, खादी सफारी, लहान मुलांसाठी लॉंग, शाळेच्या मुलांसाठी बॅग असलेला रेनकोट यासह अनेक प्रकार येथे विक्रीला आहे. रेनकोट २०० ते ५०० रुपयापर्यंत विकला जातो.

"गेल्या वर्षी छत्री व रेनकोटचा सिझन नसल्याने माल तसाच पडलेला आहे. काही छत्र्या कुरतडून खराब केल्या आहेत. तसेच, रेनकोटची देखील तीच स्थिती आहे. गेल्या वर्षी पडलेल्या मालामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पाऊस पडला तर छत्री व्यवसाय बहरेल. नाहीतर पडलेला माल सुध्दा विकला जाण्याची शक्यता नाही." - शहजाद शेख, विक्रेता, किदवाई रोड, मालेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT