Konarknagar crowded market on the busy road of the urban settlement & A bazaar filling Trimurti Chowk at Pethe School esakal
नाशिक

Nashik Unauthorized Vegetable Market : नाशिक शहरात अनधिकृत भाजी बाजाराचे पेव!

Latest Nashik News : सध्या शहरात सर्वात मोठी भाजी बाजाराची समस्या निर्माण झाली आहे. अवघ्या ६८ भाजी बाजारांना मान्यता आहे. परंतु उपनगरांमध्ये भाजी बाजारांची गरज भासू लागली आहे. महापालिका गरज पूर्ण करत नसल्याने अनधिकृत भाजी बाजाराचे पेव सुटले आहे.

विक्रांत मते

Nashik Unauthorized Vegetable Market : शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सुविधांची निर्मितीदेखील तेवढ्याच गतीने होण्याची आवश्‍यकता आहे. परंतु महापालिका प्रशासनाकडून फक्त रस्त्यांच्या कामांकडेच लक्ष दिले जाते. त्यामुळे विकासाचा असमतोल होत आहे. रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या मूलभूत सेवा- सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

त्यात आता पार्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व भाजी बाजार या महत्त्वाच्या सुविधांची भर पडली आहे. पार्किंग सेवा पुरविण्यात महापालिका कमी पडत आहे. खर्चिक व सोपे असल्याने मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही बसविले जात आहेत. (Unauthorized vegetable market increasing)

मात्र सीसीटीव्हीचे एकत्रित डेटा सेव्हिंग होत नाही. सध्या शहरात सर्वात मोठी भाजी बाजाराची समस्या निर्माण झाली आहे. अवघ्या ६८ भाजी बाजारांना मान्यता आहे. परंतु उपनगरांमध्ये भाजी बाजारांची गरज भासू लागली आहे. महापालिका गरज पूर्ण करत नसल्याने अनधिकृत भाजी बाजाराचे पेव सुटले आहे.

"महापालिकेने फेरीवाल्यांचे योग्यप्रकारे नियोजन करावे. नागरिकांच्या गरजेनुसार भाजी बाजारांची निर्मिती करावी. अधिकृत व अनधिकृत, असा भेद न करता विक्रेत्यांना हक्काची जागा द्यावी."- वसंत ठाकूर, सदस्य, शहर फेरीवाला समिती.

"शहराचा विस्तार वाढत असताना भाजी बाजाराचीदेखील आवश्‍यकता आहे. महापालिकेने भाजी बाजाराचे नियोजन करावे. त्याचबरोबर अस्तित्वात असलेल्या बाजारांमध्ये ओट्यांची संख्या वाढवावी."- संतोष पेलमहाले, सदस्य, शहर फेरीवाला समिती.

"कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने रोजगारासाठी अनेकांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे संख्येत वाढ झाली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारे बाजार तत्काळ हटविले जातात. त्यानंतर तक्रारीनुसार विक्रेत्यांवर कारवाई केली जाते."

- मयूर पाटील, उपायुक्त, अतिक्रमण विभाग.

"घरापासून जवळच्या ठिकाणी भाजी उपलब्ध होत असल्याने खरेदी केली जाते. अधिकृत किंवा अनधिकृत भाजी बाजाराचा खरेदीदाराशी संबंध नाही. महापालिकेने गरज लक्षात घेऊन भाजी बाजार तयार करावे."- उषा वाघ, गृहिणी.

"शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भाजी बाजारांची आवश्‍यकता आहे. भाजी बाजार घरापासून दूर अंतरावर नको."- मयूरी भामरे, गृहिणी.

तीन हजार ओटे

महापालिकेला उत्पन्न मिळावे, तसेच शहरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहा विभागात व्यापारी संकुल, भाजी मार्केट, खोका मार्केट उभारण्यात आले आहे. यात सुमारे तीन हजार गाळे आणि ओटे आहेत.

भाजी बाजाराचे फायदे

- ग्राहकांना ताजा व स्वस्तात भाजीपाला उपलब्ध.

- घरापासून जवळच्या अंतरावर भाजीपाला.

- रोजगाराची निर्मिती.

- ग्रामीण भागातील शेतमाल थेट बाजारपेठेत.

अनधिकृत भाजीबाजाराचे तोटे

- बकालपणात वाढ

- उघड्यावर शौचाचे वाढते प्रमाण

- बाजार उठल्यानंतर खराब झालेली भाजी जागेवरच पडून

विभागनिहाय अनधिकृत भाजी बाजार

नाशिकरोड विभाग

- बिटको उड्डाणपुलाखाली

- छत्रपती शिवाजी पुतळा

- सीएनपी प्रेससमोर

- इंदिरा गांधी पुतळा, जेल रोड

- राजराजेश्‍वरी चौक ते शनि मंदीर, पंचक

- जाचकनगर, जयभवानी रोड

सिडको विभाग

- वडाळा-पाथर्डी रोड, पांडवनगरी.

- पाथर्डी फाटा मच्छी बाजार.

- उपेंद्रनगर.

- सिम्बॉयसिस शाळेजवळ

- पवननगर

- छत्रपती शिवाजी चौकातील रस्त्यावर, जुने सिडको.

पूर्व विभाग

- आझाद चौक, जुने नाशिक.

- पूर्व विभागीय कार्यालयाची मागील बाजू.

- महात्मा फुले मार्केट.

- रथचक्र चौक.

- उपनगर सिग्नलच्या बाजूने.

- त्रिकोणी गार्डन, काठे गल्ली.

- जय शंकर लॉन्सजवळ, तपोवन लिंक रोड.

पश्‍चिम विभाग

-आकाशवाणी टॉवर जवळील रस्त्यावर.

- नवरचना हायस्कूल जवळ, जेहान सर्कल.

पंचवटी विभाग

- दिंडोरी नाका.

- निलगिरी बाग

- पेठ रोड

- क्रांतीनगर, मखमलाबाद रोड.

- हिरावाडी

- जत्रा हॉटेल समोर

- म्हसरुळ गाव

- किशोर सूर्यवंशी मार्ग

- कन्सारा माता चौक

- आरटीओ ऑफीस समोर पेठरोड.

- सप्तरंग, पेठ रोड

- रासबिहारी लिंक रोड

- अमृतधाम लिंक रोड

सातपूर-

- कार्बन नाका, औद्योगिक वसाहत.

- अशोक नगर पोलिस चौकीसमोर.

- मोतीवाला कॉलेज रस्त्यावर.

- सातपूर बसस्थानकशेजारी.

- एबीबी कंपनी शेजारी.

- सीएट कंपनी शेजारी.

- नाईस संकुल बाजूला.

- ईएसआयसी समोर (सकाळी)

- त्र्यंबक रस्ता (एबीबी सर्कल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

SCROLL FOR NEXT