सोयगाव : ‘झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या’ या गीताची आठवण उन्हाळ्यात हमखास येते. पूर्वी शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच मुलांना मामाच्या गावाला अर्थात ‘आजोळी’ जायची ओढ लागत असे. मामाही भाचेकंपनींच्या स्वागतासाठी तयार असे. (Nashik Summer Heat)
परंतु, बदलत्या काळात काटकसरीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने व उन्हाचा तडाखा वाढल्याने मामाची गावे परकी झाली आहेत. ज्यांच्याकडे पैशाला कमी नाही अशांनी हवे त्या पर्यटनस्थळी जावे, हॉटेलमध्ये राहावे व मनसोक्त बागडण्याचा आनंद घ्यावा, असे चित्र सर्वत्र दिसून येते. उन्हाळ्यात घरात बसून किंवा मैदानात जाऊन खेळणारे पारंपरिक खेळ आज खेळले जात नाहीत.
पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्या हव्याहव्याशा वाटत असत. परंतु, आता सुट्ट्या आल्या की काय करावे, हा प्रश्न निर्माण होतो. पूर्वी सुट्ट्या लागताच घरा-घरात अडगळीत पडलेले बुद्धिबळाचे पट, कॅरम बोर्ड व पत्त्यांचे कॅट बाहेर निघत असत.
परंतु, बदलत्या काळात संगणक व ‘व्हिडीओ गेम’चाच बोलबाला अधिक असून, शहरी भागात सर्वच वयोगटांत याच वस्तू प्रिय झाल्याचे चित्र असले तरी भारनियमनाचा तडाखा बसलेल्या ग्रामीण भागात मात्र इलेक्ट्रॉनिक सेलवरील गेम, मोबाईल गेम खेळण्याकडे अधिक कल आहे. काळाच्या ओघात उन्हाळ्यातील खेळ आता इतिहासजमा झाले आहेत. (latest marathi news)
पूर्वी चार मुलांनी एकत्र जमायचे, बुद्धिबळ, कॅरम किंवा सापशिडीत मन रमवायचे. यातून बालमित्र अधिकाधिक जवळ येत असत. परंतु, आता त्या खेळांना मुले पसंत करीनासे झाले आहेत. शहरी भागात व्हिडीओ गेम आणि ग्रामीण भागात सेलवरील इलेक्ट्रॉनिक गेम, मोबाईल गेम खेळण्यावरच सध्याभर दिसतो.
गेल्या काही वर्षांत क्रिक्रेटचे फॅड आले असून, त्याकडे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वळू लागले आहेत. मुलांना क्रिकेटचे वेड लागले आहे. त्यामुळे उन्ह उतरताच मुले घरोसमोर किंवा मोकळ्या मैदानात जाऊन क्रिकेटचा आनंद घेत असतात. जी मन:स्थिती मुलांची झाली आहे तीच मुलींची झाली आहे.
"पाचवीपासून ते उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मामाच्या गावाला म्हणजेच आघार खुर्द या गावी लहानाचा मोठा झालो. लेकीचं मूल म्हणजेच आजी-आजोबांसाठी जीव की प्राण... जीवनाचा सारीपाठ मला मामाच्या गावाने शिकवला पण हल्ली मला असं वाटतं की मुलांना मामाचं गाव जरा परकं झालं आहे."- अनिल सोळुंके, प्राथमिक शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.