Nashik News : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यामांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेशाची प्रक्रिया बारगळली आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्याने सोडत जाहीर करूनही शिक्षण विभागाने तपशील जाहीर केलेला नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार सोडत जाहीर करणार असल्याची भूमिका शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या तरी ‘न्यायालयात याचिका, अन् रखडली प्रवेश प्रक्रिया’ अशी या योजनेची स्थिती आहे. (Under Right to Education Act admission process)
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देताना मोफत प्रवेशाची योजना राबविण्यात येत होती. यासंदर्भात तांत्रिक कारणांनी एक नव्हे दोन वेळा संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज मागविले होते. पुढील टप्प्यात सोडतीची तारीखही जाहीर केली होती.
मात्र यंदा प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळे येत असून, न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी होऊ न शकल्याने अद्याप पुढील प्रक्रिया ठप्प झाली आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत शिक्षण विभागाचे या योजनेसाठीचे संकेतस्थळ ठप्प झालेले होते. मात्र नुकताच प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सूचना शिक्षण विभागाने संकेतस्थळाच्या माध्यमातून जारी केली आहे. (latest marathi news)
त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी सूचना जारी केलेली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ
दरम्यान शनिवार (ता.१५) पासून शाळांना सुरवात होत असून, नियमितपणे अध्ययन प्रक्रियेला सुरवात होणार आहे. दुसरीकडे आरटीईचे प्रवेश रखडल्याने या योजनेतून प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांने शैक्षणिक नुकसान होणार आहे. सोडत जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत द्यावी लागेल. रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश दिले जातील. ही संपूर्ण प्रक्रिया साधारणतः महिनाभर चालण्याचा अंदाज असल्याने विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.