Speaking at a meeting of scholars organized by BJP Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad. esakal
नाशिक

Nashik News : मोदींकडे देशाच्या विकासाची पुढच्या 25 वर्षांची ‘ब्ल्यू प्रिंट’ : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ना खाउंगा, ना खाने दुंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्रिदवाक्यामुळे त्यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारमध्ये एकही घोटाळा झालेला नाही. दहा वर्षांच्या काळात या सरकारच्या पारदर्शक कारभारातून सरकारने अर्थव्यवस्थेत उत्तुंग झेप घेतली आहे. पुढच्या २५ वर्षांसाठी देशाच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. (Nashik Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad)

गुरुवारी (ता. १६) भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित प्रज्ञावंतांच्या संमेलनात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश भाजप सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, गिरीश पालवे, गोविंद बोरसे, डॉ. मंजूषा दराडे, श्रीधर व्यवहारे, सुनील बच्छाव, चंचल साबळे, डॉ. वैभव जोशी, डॉ. विनय मोगल, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, सुनील केदार, अॅड. श्‍याम बडोदे, सोनल दगडे आदी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, की मोदी सरकारच्या विविध मंत्रालयांतील आपापसांतील समन्वयामुळे कामकाज पद्धती गतिमान झाली आहे. २०१४ मध्ये देशाचे अंदाजपत्रक १६ लाख कोटींचे होते, ते आता ४९ लाख कोटींचे झाले आहे. इ- कॉमर्ममुळे देशात अनेक आर्थिक क्षेत्रात रिफॉर्म आले आहेत. रिफॉर्म, परफॉर्म, डिलीवर या त्रिसूत्रीप्रमाणे देशात काम सुरू आहे.

देशाची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू असताना देव, देश, धर्मही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. या वेळी श्रीधर व्यवहारे यांनी उपस्थित केलेल्या बंद कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे सांगितले असता त्यांनी त्यासाठी उद्योगमंत्र्यांबरोबर चर्चा करून यावर यथोचित पावले उचलू, असे सांगितले. (latest marathi news)

उपस्थित प्रज्ञावंतांनी नाशिक- पुणे रेल्वे प्रकल्प, ट्रॅक्टरचा समावेश शेती उपयोगी उपकरण म्हणून तरतूद व्हावी, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही पेन्शन मिळावे, नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कॉरिडोर निर्मिती, तरुणांना रोजगार, वकिलांना संरक्षण याबाबत प्रश्न केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्यासमोर मांडले.

प्रदेश मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण यांनी बुद्धिवंत सेलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावर आपण सकारात्मक काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. दराडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जोशी यांनी सूत्रसंचालन केले. श्री. केदार यांनी आभार मानले. या वेळी शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील तसेच प्रज्ञावंत सेलचे सदस्य उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT