Speaking at the Industry Interaction of Skilling meeting, Central Skill Development and Industry Secretary Manoj Kumar Tiwari, present Skill Development Commissioner Nidhi Chaudhary, Divisional Commissioner Pravin Gedam, esakal
नाशिक

Nashik News : नाशिकमध्ये देशाचे कौशल्य हब होण्याची क्षमता : केंद्रीय सचिव अतुलकुमार तिवारी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच युवकांना तांत्रिक कौशल्य, कार्यानुभव देण्याच्या दृष्टीने अनेक योजना सुरू आहेत. जगात भारताला कौशल्य हब बनविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. नाशिकमधील कौशल्य विकसित करण्याची क्षमता पाहता देशाची कौशल्य राजधानी घडविण्याची क्षमता नाशिकमध्ये आहे. (Nashik has potential to become skill hub of country)

त्यादृष्टीने शासन, प्रशासन, उद्योजकांच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचे केंद्रीय सचिव अतुलकुमार तिवारी यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री, क्वालिटी सिटी नाशिक, क्रेडाई, रामकृष्ण आरोग्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २६) स्कील सिटी नाशिकनिमित्त कौशल्य विकास उद्योजक समन्वय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

त्या वेळी श्री. तिवारी बोलत होते. या वेळी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कौशल्य विकासच्या राज्य सचिव निधी चौधरी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, ‘एनएसडीएस’चे संचालक जितूभाई ठक्कर, आशिष पेडणेकर, प्रवीण मानगावे, प्रमोद खैरनार आदी उपस्थित होते.

नाशिक स्कील सिटीसंदर्भातील सादरीकरणाने प्रभावित झालो असल्याचे सांगत तिवारी म्हणाले, की कौशल्याला शिक्षणाच्या समकक्ष आणण्याच्या दृष्टीने नाशिक हा देशातील सर्वोत्तम जिल्हा असल्याचा माझा ठाम विश्वास झाला आहे. शिक्षणाइतकाच सन्मान कौशल्यालाही मिळवून देण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणापासून युवांना तांत्रिक कौशल्य, कार्यानुभव देण्याच्या दृष्टीने योजना कार्यान्वित आहे. आठवीपासूनच्या अभ्यासक्रमातच विद्यार्थ्यांना हस्तकौशल्य. (latest marathi news)

तांत्रिक कौशल्याचे प्रात्यक्षिक शिक्षण मिळाले तरच समाजाच्या मानसिकतेत बदल होण्यास मदत होणार आहे. थेअरीइतकेच प्रॅक्टिकल ज्ञान मिळाल्यासच विद्यार्थी हे उद्योगांच्या अपेक्षेप्रमाणे घडू शकतील. तसेच, आयटीआयमधील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण केवळ १२ टक्के असून, ते किमान २५ टक्क्यांपर्यंत नेण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे तिवारी यांनी सांगितले. अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा त्यांनी ऊहापोह केला.

राज्याच्या नवीन घोषणेनुसार १० लाख युवांना विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये इंटरशिप दिली जाणार असून, तशा प्रकारे नोंदणीकृत कंपन्यांना युवा बेरोजगार रोजगार देऊन मनुष्यबळही मिळू शकणार असल्याचे राज्य सचिव चौधरी यांनी सांगितले. संबंधित कंपनीने त्यांच्या गरजेनुसार त्या मनुष्यबळाला प्रशिक्षण दिल्यास त्यांचा कौशल्य विकास साधला जाणार आहे.

उद्योगांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात १५ टक्के अँप्रेटिसशिप देणे अपेक्षित आहे. तसेच, अनेक ‘आयटीआय’मध्ये काळानुरूप नवनवीन कोर्सेसचा अंतर्भाव केला असून, त्यात नाशिकमधील सातपूरच्या आयटीआयमध्ये नवीन कोर्सेस सुरू झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. केंद्र व राज्य सरकारने युवांना अँप्रेटिसशिप देण्याच्या घोषणेने उद्योगांचे काम बरेच सोपे होणार असून, त्यातून उद्योगांना अपेक्षित कौशल्यवान युवा घडू शकणार असल्याचे सांगितले.

त्यासाठी उद्योगांनी शासनाकडे नोंदणी करून या योजनेचा लाभ मिळवितानाच महाराष्ट्राला कौशल्याधिष्ठीत युवांचे प्रमुख राज्य बनविण्यात योगदान द्यावे. देशाला २०४७ पर्यंत विकसित घडविण्याचे ध्येय असून, त्यापूर्वीच चार-पाच वर्षे आधी नाशिकला विकसित घडविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त गेडाम यांनी या वेळी केले.

सुरवातीला चेंबरचे अध्यक्ष गांधी, श्री. ठक्कर, श्री. खैरनार यांनी नाशिकसह महाराष्ट्राला कौशल्यपूर्ण घडविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. किरण नारायण यांनी प्रास्ताविक केले. ‘क्रेडाई’चे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT