Nashik News : आरोग्य शिक्षणात संशोधन व नवीन संकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे प्रिंटिंग आणि थ्रीडी उपकरणांसह लॅब स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने थ्रीडी ग्राफी या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. (Nashik University of Health Sciences will create 3D lab)
या कराराच्या माध्यमातून विद्यापीठाचे ‘दिशा’ आणि ‘दृष्टी’ कक्षामार्फत ‘इनोव्हेशन’ व ‘इन्कुबेशन’ संदर्भात मोठया प्रमाणात काम करण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी दिली. आरोग्य विज्ञान विद्यापीठात मंगळवारी (ता. ३०) सामंजस्य कराराचे आदानप्रदान झाले. या वेळी कुलगुरू डॉ. कानिटकर, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, सोशल अल्फाचे संस्थापक मनोज कुमार.
थ्रीडी ग्राफीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिबू जॉन, सी कॅम्पचे प्रोग्राम डायरेक्टर डॉ. रवी नायर, थ्रीडी ग्राफीचे रिना शिबू, सोशल अल्फाचे डॉ. चारुता मांडके, डॉ. म्रिगांक वॉरिर, डॉ. क्षमा कोठारी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. कानिटकर म्हणाल्या, की तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसह प्रशिक्षण मॉड्यूल्स तयार करणे आणि नियमित अंतराने प्रशिक्षण घेणे याकरिता थ्रीडी ग्राफिक्ससमवेत परस्पर सामंजस्य करार करण्यात येत आहे.
थ्रीडी डिझाइन तज्ज्ञ, स्टार्टअप्स, डॉक्टर, उद्योजकांना प्रोत्साहित करून उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. प्र-कुलुगुरू डॉ. निकुंभ म्हणाले, की नावीन्यपूर्ण थ्रीडी मुद्रित वैद्यकीय उपकरण उत्पादने सादर करण्यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण आहे. थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाभ होईल. (latest marathi news)
यासाठी विद्यापीठ सकारात्मकतेने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ व सोशल अल्फाचे संस्थापक मनोज कुमार यांनी परस्पर सामंजस्य करारपत्राचे आदानप्रदान केले. डॉ. सुनील फुगारे आणि विधी अधिकारी ॲड. संदीप कुलकर्णी यांनी समांजस्य कराराची प्रक्रिया पूर्ण केली.
शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुबोध मुळगंद व सायना भालेराव यांनी सादरीकरणातून विद्यापीठ प्रकल्पांची माहिती दिली. प्रमुख विशेष कार्य वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, डॉ. सुनील फुगारे, अधिकारी डॉ. सुबोध मुळगुंद, कर्नल वरुण माथूर, विधी अधिकारी ॲड. संदीप कुलकर्णी, महेंद्र कोठावदे, डॉ. नितीन कावेडे, डॉ. स्वप्नील तोरणे आदी उपस्थित होते.
शासकीय, खासगी प्रयोगशाळांसाठी काम
आरोग्य विद्यापीठाच्या लॅबच्या माध्यमातून शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेच्या उपक्रमांसाठी एकत्रितपणे काम करण्यात येणार आहे. थ्रीडी लॅबमध्ये नोंदणीकृत सर्व थ्रीडी तंत्रज्ञान कंपन्या, संशोधक, शास्त्रज्ञ, डॉक्टरांच्या नेटवर्कच्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात येईल. संशोधनाच्या अनुषंगाने आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती सोशल अल्फाचे संस्थापक मनोज कुमार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.