Damage to harvested rice due to unseasonal rains. In the second photo, a horizontal rice crop. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: इगतपुरीत 30, तर त्र्यंबकेश्वरमध्ये 46 मिमी पाऊस! ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांचा धोका

विजय पगारे

इगतपुरी : तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या भात पिकाला सर्वाधिक फटका बसला. शेताच्या बांध्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने कडपा भिजल्याने भात पाखड होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमवावे लागणार आहे.

सोमवारी (ता. २७) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. इगतपुरी तालुक्यात २४ तासांत ३०, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात ४६ मिलिमीटर पाऊस झाला. (Nashik Unseasonal Rain 30 mm in Igatpuri 46 mm in Trimbakeshwar Risk of pests due to cloudy weather)

इगतपुरी तालुक्यात यंदा २७ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. तालुक्यात जून ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस झाल्याने कृषी विभागाने विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

दिवाळीपूर्वी गरी, हाळे व इतर भात निघतो. त्यामुळे शेतकऱ्यांना भाताची विक्री करून दिवाळी साजरी करण्यास आणि उसनवारी फेडण्यास मदत होते. बऱ्याच शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वीपासून हलक्या भाताच्या कापणीला सुरवात केली होती.

कापणी केलेल्या भाताच्या कडपा बांध्यामध्ये पडून होत्या. अवकाळी पावसामुळे कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्या, तर काही भागात बांध्यामध्ये पाणी साचल्याने भात सडला.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

मागील दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळे भात पिकांवरील कीड व इतर रोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हाती आलेले पीक गमवावे लागणार नाही ना, अशी भिती शेतकऱ्यांना सतावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT