Nashik Unseasonal Rain Damage  esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage : अकराशे कोटींच्या शेतमालावर जिल्ह्यात 8 दिवसांत पाणी!

महेंद्र महाजन

Nashik Unseasonal Rain Damage : अवकाळी पाऊस, वेगवान वारे आणि गारपिटीने (Nashik News) ७ ते १२ एप्रिलला ६५७ कोटींच्या २३ हजार ६९९ हेक्टरवरील पिकांची धूळधाण झाली होती. (Nashik Unseasonal Rain Damage calamity in 2 days has destroyed 457 crores of agricultural land on 14 thousand 283 hectares nashik news)

त्यानंतर शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता. १६) या दोन दिवसांमधील आपत्तीने १४ हजार २८३ हेक्टरवरील ४५७ कोटींच्या शेतमालावर ‘पाणी’ फिरविले आहे. या महिन्यांतील ८ दिवसांमध्ये ३७ हजार ९८२ हेक्टरवरील १ हजार ११४ कोटींहून अधिक आर्थिक संकटाला जिल्ह्यातील ७८० गावांमधील ६६ हजार २९३ शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.

जिल्ह्यात १५ आणि १६ एप्रिलला झालेल्या अवकाळी पाऊस, वेगवान वारे आणि गारपिटीमध्ये ३१३ गावातील ३० हजार ४८१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन दिवसांमधील नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असून, प्रत्यक्ष पंचनाम्यातून नुकसानग्रस्त क्षेत्रात भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपत्तीग्रस्त क्षेत्र, त्यातून मिळणारे अपेक्षित उत्पादन आणि बाजारभावाच्या आधारे गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक २६८ कोटींचे नुकसान कांद्याचे झाले आहे. त्याखालोखाल १६३ कोटींच्या द्राक्षांचा चुराडा झाला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

दोन दिवसांमधील इतर पिकांचे नुकसान रुपयांमध्ये असे : गहू- १ कोटी ८७ लाख, मका- १२ लाख ९० हजार, टोमॅटो- १ कोटी ७७ लाख, बाजरी- २ लाख ९५ हजार, भाजीपाला व इतर- ६ लाख ५५ हजार, कांदा रोपे- ७० लाख ३५ हजार, वेलवर्गीय फळे- १ लाख १३ हजार, आंबा- ३६ लाख ५५ हजार, डाळिंब- १५ लाख ६ हजार.

दोन दिवसातील नुकसानग्रस्त क्षेत्र हेक्टरमध्ये पिकनिहाय असे : कांदा- ११ हजार ९१०, गहू- १८७.१, भूईमूग- ८.९५, मका- १२.९, टोमॅटो-७१, बाजरी- ४.९२, भाजीपाला व इतर- २६१.७२, कांदा रोपे- ३३.५०, वेलवर्गिय फळे- ३, द्राक्षे- १६२८.३८, आंबा- ३६.५५, डाळिंब-१२५.४७.

बागलाणमध्ये सर्वाधिक नुकसान

जिल्ह्यात आठ दिवसांत तालुकानिहाय नुकसान असे (क्षेत्र हेक्टरमध्ये) : मालेगाव- ९१५.५०, बागलाण- २३ हजार ४२२.७५, नांदगाव- ५ हजार ४४४.२०, कळवण- ७२४, देवळा- ३५५.४७, दिंडोरी- १ हजार ८६६.८७, सुरगाणा- ५६८.४५, नाशिक- ५९७.३०, त्र्यंबकेश्‍वर- १७.७५, पेठ- २१४.१३, इगतपुरी- ५४४, निफाड- १ हजार ५४६.९७, सिन्नर- ३७७.३०, चांदवड- १ हजार २९४.५०, येवला- ९२.६०.

जिल्ह्यात ४ दिवसात ४७६ टक्के पाऊस

उन्हाळ्यातील एप्रिलमध्ये १७ दिवसांमध्ये सर्वसाधारण ३.७ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात मात्र सरासरी १७.६ मिलीमीटर पाऊस ४ दिवसांमध्ये झाला असून, त्याचे टक्केवारी ४७५.७ टक्के इतकी आहे.

तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस मिलीमीटरमध्ये आणि त्याचे दिवस अनुक्रमे याप्रमाणे : मालेगाव- १२.८-२, बागलाण- ३०.५-३, कळवण- १७.४-५, नांदगाव- ३३.१-४, सुरगाणा- ९.९-१, नाशिक-१८.३-४, दिंडोरी- ८.४-१, इगतपुरी- १६.५-२, पेठ- ११.१-१, निफाड- १७.७-३, सिन्नर- २७.८-४, येवला- १०.९-१, चांदवड- २२.८-४, त्र्यंबकेश्‍वर- २.७-१, देवळा- ११.४-२.

पिकनिहाय ८ दिवसांमध्ये झालेली हानी (आकडे हेक्टरमध्ये)

० कांदा- ३० हजार २५६ ० कांदा रोपे- ६६.५०

० गहू- ७२३.८० ० इतर फळपिके- ११

० हरभरा- १२ ० वेलवर्गीय फळे- ३८

० भूईमूग- ८.९५ ० मोसंबी- ८.२०

० मका- ३८०.६० ० चिकू- ८.२०

टोमॅटो- ३२६.२० ० पेरु-३.२०

० बाजरी- २२६.८० ० द्राक्षे- २ हजार ६४५

० भाजीपाला व इतर- १ हजार ७१६ ० आंबा- ५००.५५

० ऊस- ७ ० लिंबू- १३.६०

० चारा पिके- ३३ ० डाळिंब- ९९७.४७.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT