Nashik district hit by hail esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा! वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. द्राक्ष व कांद्याच्या शेतात पाण्यासह गारांचा अक्षरश: सडा पडला. दोन ते अडीच एमएमच्या आकाराच्या गारा पडल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.

बागलाण तालुक्यातील साल्हेर भाटंबा येथे वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Nashik Unseasonal Rain Damage Nashik district hit by hail Unfortunate death of farmer due to electrocution)

जिल्ह्यात रविवारी (ता. २६) दुपारी पावसाला सुरवात झाली. सिन्नर, निफाड, दिंडोरी व चांदवड या भागातील द्राक्षबागांना गारांचा तडाखा बसला. शेतात पावसाचे पाणी साचल्याने काढणीला आलेला कांदा सडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा पावसाळ्यात कमी पाऊस झाला आणि हवामानही कोरडे राहिल्याने द्राक्ष जोमात होते; पण या पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत भर घातली. दुपारपासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली. विजांचा कडकडाट व गारांचा मारा करीत पावसाचे आगमन झाले.

नांदगाव, मालेगाव, देवळा, कळवण या भागातही गारांचा मारा करीत पाऊस झाला. भाटंबा (ता. बागलाण) येथील शेतकरी सुरेश मुरलीधर ठाकरे (वय ३८) यांचा, अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाल्याचे समजते.

याशिवाय, जोराचा वारा असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांना मंगळवार (ता. २८)पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला.

हिवाळी मोसमी वारे चक्रीय सक्रिय झाल्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हा पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करतील.

यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.

अवकाळीच्या भरपाईला उशीर, त्यात पावसाची भर

मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे पाच हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई आता शेतकऱ्यांना मिळत आहे.

नांदगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलन केले होते. ही भरपाई मिळत असताना आता गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानीचे काय, याविषयी शेतकऱ्यांना चिंता सतावते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

Latest Maharashtra News Updates : राजकीय पुढारी, उमेदवारांचे शहर महामार्गांवर मोठाले बॅनर

SCROLL FOR NEXT