While inspecting the onion field affected by hail in Chandwad taluka, MLA Dr. Rahul Aher, Collector Jalaj Sharma, District Magistrate Chandrasekhar Deshmukh etc. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: चांदवड तालुक्यात कांद्याला फटका! आमदार डॉ. आहेर यांच्याकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

चांदवड- लासलगाव : चांदवड तालुक्यातील तळेगाव (रोही), वाकी, वडगाव- पंगू आणि परिसरात रविवारी झालेल्या गारपिटीने मोठी हानी झाली असून कांद्याचे पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

या नुकसानीची पाहणी करत आमदार डॉ, राहुल आहेर यांनी आज शेतकऱ्यांना धीर दिला. शासकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांनी पंचनाम्यांकडे लक्ष देण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला केल्या. (Nashik Unseasonal Rain Damage Onion hit in Chandwad Taluka MLA Dr Inspection by Aher )

रविवारच्या अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपिटीने कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. तळेगाव रोही येथील अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळावर सामना करत टँकरने पाणीपुरवठा करून कांदा व टोमॅटोचे पीक घेतले होते.

थोड्याच दिवसांत कांदे काढणीला येणार होते. त्याआधीच झालेल्या गारपिटीने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. आधीच दुष्काळाच्या झळा सोसत असताना पिके नेस्तनाबूत झाली आहेत. हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज तालुक्याच्या गावांना भेटी दिल्या.

प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, कृषी सहाय्यक अधिकारी एस. ए. जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोकडे, तलाठी के. व्ही. सालगुडे, ग्रामविकास अधिकारी एस. एस. गवई, सरपंच भाऊसाहेब जिरे, ग्रामपंचायत सदस्य शरद गाडे, पुंजाराम वाकचौरे, दीपक ठाकरे, राजेंद्र पाटील, लालकृष्ण मोरे, रेवण सोनवणे,

शोभाताई रोकडे, वनिता केदारे, प्रगतशील शेतकरी पुंजाराम वाकचौरे, मधुकर वाकचौरे, बबन वाकचौरे, रामभाऊ वाकचौरे, बाबाजी वाकचौरे, अनिल पाटील, विक्रम वाकचौरे ,दीपक ठाकरे, लक्ष्मण जिरे अशोक शेळके, सोपान कोकणे, कैलास जिरे,भाऊसाहेब नाईक, राजाराम वाकचौरे, दौलत वाकचौरे आणि ग्रामस्थ मंडळी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Marathi Language Controversy: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा! प्रवाशाला हिंदीत बोलण्याची जबरदस्ती, व्हिडिओ व्हायरल

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

SCROLL FOR NEXT