Onion horses found in unseasonal rain water in Kamad Shivara on Sunday. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage : काटवन परिसरात कांदापीक पाण्यात; अवकाळीचा पुन्हा तडाखा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Unseasonal Rain Damage : दिघावेसह (ता. साक्री) परिसरात रविवारी (ता. ३०) दुपारी सुमारे दोन तास अवकाळी पावसात उन्हाळ कांदापीक पाण्यात सापडल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

लागवडीपासून काढणीपर्यंतचा मोठा आर्थिक खर्चही पाण्यात जाणार असल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट उभे ठाकले आहे.

तथापि, शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती महसूल आणि कृषी विभागास दिल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा खेद शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. (Nashik Unseasonal Rain Damage Onion wet water in Katwan area weather strikes again news)

गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह उन्हाळ कांद्याचे पीक संकटात सापडले आहे. यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने सोळा गाव काटवन परिसरातील दिघावे, उंभर्टी, उंभरे, देगाव, छाईल, प्रतापपूर, गणेशपूर, कासारे आदी भागात बागायती शेती वाढली आहे. दिघावे येथील

भारती अशोक दशपुते यांच्या सगळ्या कांद्याच्या घोड्या पाण्यात सापडल्या आहेत. सौ. दशपुते यांनी सुमारे तीन एकर क्षेत्रात कांदालागवड केली आहे.

अवकाळी पाऊस थांबता थांबेना..!

यंदा सर्वांनाच उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. ऐन कांदापीक काढणीच्या वेळेत अवकाळी पावसाने हाहाकार उडविला आहे. दरवाढीच्या अपेक्षेने यंदा कांदालागवड वाढली आहे. कांदालागवडीपासून काढणीपर्यंत मोठा आर्थिक खर्चही झाला आहे.

शिवाय भविष्यात दर वाढतील या अपेक्षेने कांदा चाळीत साठविला जात आहे. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे चाळी नाहीत अशा शेतकऱ्यांनी उघड्यावर कांदा गोळा केला आहे. एके ठिकाणी केलेल्या राशीला घोडी म्हटले जाते. शेतात उघड्यावरील कांद्याच्या घोड्यांमध्ये पाणी साचले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

लग्नसोहळ्यांवरही विरजण..!

दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात सर्वत्र विवाह समारंभाची मोठी ‘धूम’ असते. अवकाळी पाऊस विवाह सोहळ्यातील यजमानांची मोठी धावपळ होत असल्याचे चित्र आहे. सलग तीन दिवसांच्या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमांचे नियोजन असते. अशा वेळी अवकाळी पावसामुळे कार्यक्रमांवर विरजण पडत असल्याचे चित्र आहे. लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडो, अशा आळवणीची वेळ संबंधितांवर येत आहे.

"‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे यंदा वर्षभर पावसाळी वातावरण आहे. मोठ्या कष्टाने उभी केलेली शेती आज पाण्यात आहे. दररोज कांदा पाण्यात भिजत असल्याने सडण्याच्या मार्गावर आहे. महसूल आणि कृषी विभागास माहिती दिल्यावर स्थानिक कर्मचारी हात वर करत असल्याचा अनुभव येतो." -राजेंद्र अहिरराव, माजी उपसरपंच, दिघावे (ता. साक्री)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT