Nashik Unseasonal Rain grape onion crop demolished by Heavy Rain Storm Niphad sinnar farmer tension  esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : उघड दार देवा आता...! डोळ्यादेखत सोन्यासारखी पिकं गेली मातीत

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या द्राक्ष पंढरीत रविवारी अवकाळी पावसाने गारांसह अतिशय जोरदार फटका दिल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष पंढरीत आलेल्या द्राक्षांच्या बागांवर गारांच्या तड्याख्याने बागा नेस्तनाभुत केल्या आहे. (Nashik Unseasonal Rain grape onion crop demolished by Heavy Rain Storm Niphad sinnar farmer tension)

हे कधीही न भरणारे पिकांचे नुकसान शेतकरी राजाच्या डोळ्यादेखत होत असताना कुटुंबातील चिमुकल्यांसह ज्येष्ठ धाय मोकलून रडत होते. निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. संपूर्ण राज्यात निफाड येथील शेतकरी राजांचे नुकसान कधीही न भरून निघणारे आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या हृदयात घर करून आहे.

या दिवशी अतिरेक्यांना भारतातील वीर पुत्रांनी यम सदनी पाठवले होते. या दिवशी अनेक वीर जवानांना अमरत्व प्राप्त झाले. याच दिवशी अशीच परिस्थिती आज अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात व सिन्नर तालुक्यात केल्याने हा दिवस कधीही न विसरता येणारा असल्याचे अनेकांनी सांगितले.

अवघी द्राक्ष पंढरी या गारांच्या पावसाने नाहून निघाली तर अनेक घरांच्या बाहेर गारांचा सडा पडलेला होता. सिन्नर शहरातही रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. एका मागून एक अनेक संकट यावर्षी बळीराजावर येत असून पाणीटंचाई, चाराटंचाई आता आसमानी संकट हे कधीही न भरून निघणारे आहे.

अनेक बळीराजांच्या कुटुंबावर आज पिकांसाठी काढलेले कर्ज आहे. मागचेच कर्ज फिटले नसल्याने आता अवकाळी पावसाने अतिशय नुकसान केल्याने बँके कडून घेतलेले कर्ज मातीमोल झाल्याचे अनेकांनी सांगितले. सोन्यासारखे पीक आज डोळ्यादेखत मातीत गेले असून पुढील दिवस कसे काढायचे असे अनेकांनी रडून रडून सांगितले. शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून भरघोस मदत करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

Amit Shah: “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी पुन्हा कलम 370 आणू शकणार नाहीत”; अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात सव्वा दोन एकरात गांजाची शेती; सुमारे ६ कोटींचं पीक उध्वस्त

KL Rahul - आथिया शेट्टी होणार आई-बाबा! सोशल मीडियावरून केली घोषणा

TET Exam : आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक हजेरी होणार

SCROLL FOR NEXT